EPFO Update : नोकरदारांच्या पगारातील काही भाग पीएफ (PF) म्हणून कापला जातो. गरज भासल्यास तुम्ही हे पैसे काढू शकता. प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या नियमांनुसार, दरमहा कर्मचार्‍यांच्या पगारातून कापल्या जाणार्‍या रकमेपैकी, जे पीएफ खात्यात जाते, 8.3 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत आणि 3.67 टक्के रक्कम दरमहा ईपीएफमध्ये जमा होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) पीएफ खातेधारकांना युनिव्हर्सल खाते क्रमांक म्हणजेच यूएएन (UAN) क्रमांक देते. या नंबरद्वारे तुम्ही पीएफची माहिती किंवा पैसे काढू शकता.


UAN नंबरशिवाय PF अकाऊंटवरून काढता येतील पैसे


तुम्ही पीएफचे पैसे आपत्कालीन परिस्थितींमध्ये वापरू शकता. बहुतेक कर्मचार्‍यांकडे त्यांचा UAN क्रमांक असतो, परंतु कंपनी बंद झाल्यानंतर काही लोकांकडे हा क्रमांक नसतो. तुमच्याकडे UAN नंबरही नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. शिल्लक पीएफ जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-229014016 वर मिस कॉल देऊन पीएफची रक्कम तपासू शकता.


UAN नंबरशिवाय पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी तुम्हाला स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. येथे एक नॉन कंपोझिट फॉर्म भरावा लागेल. यानंतर तुम्ही PF खात्यातून पैसे काढू शकाल. पीएफ खात्यातून ऑनलाइन पैसे काढण्यासाठी तुम्हाला UAN क्रमांक, पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक आवश्यक असेल. त्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकाल.


EPFO मध्येही मिळतोय जीवन विमा


EPFO ​​आपल्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना जीवन विम्याचे संरक्षण देते. मात्र, अनेक ग्राहकांना याची माहिती नसते, त्यामुळे ते याचा लाभ घेऊ शकत नाहीत.  EPFO कडून ​​कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी आणि पेन्शनसह विमा संरक्षण देण्यात येते. 1976 पासून ईपीएफओमधील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले जात आहे. परंतु माहितीच्या अभावामुळे अनेकांना हे माहित नाही.  


EPFO ​​द्वारे नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाठी एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) ही योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना ईपीएफ आणि ईपीएसच्या संयुक्तपणे काम करते. या योजनेत नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास EPFO ​​कडून त्याच्या नॉमिनीला आर्थिक मदत म्हणून सात लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते. या विमा योजनेत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाते.


महत्त्वाच्या इतर बातम्या


प्रतिकूल परिस्थितीत पालकच नसतील, तर 'अशा' मुलांसाठी पेन्शनची व्यवस्था, जाणून घ्या रक्कम कशी मिळणार?