EPFO Pension Scheme : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात अनेक ठिकाणी कुटुंबातील कमावत्या सदस्यांचा मृत्यू झाल्याचे, तसेच अनेक मुले अनाथ झाल्याचे दिसून आले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने EPS योजनेअंतर्गत अनाथ मुलांना मिळणाऱ्या फायद्यांची (EPS बेनिफिट्स) माहिती दिली आहे. जाणून घ्या सविस्तर
..तर त्यांच्या मुलांना आर्थिक पाठबळ देण्याची व्यवस्था
जर पालकांपैकी एक किंवा दोघेही पगारदार पालक असतील आणि कर्मचारी पेन्शन योजनेचे सदस्य असतील, तर त्यांच्या मुलांना आर्थिक पाठबळ देण्याची व्यवस्था केली जाते EPFO पेन्शन स्कीम म्हणजेच EPS अंतर्गत पैसे जमा करण्यासाठी, कंपनी आपल्या कर्मचार्यांच्या पगारातून पैसे कापत नाही, परंतु कंपनीच्या योगदानाचा फक्त एक भाग EPS मध्ये जमा केला जातो.
EPS अंतर्गत मुलांसाठी हे फायदे असतील
-अनाथ मुलांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाची रक्कम मासिक विधवा निवृत्ती वेतनाच्या 75 टक्के असेल.
-प्राप्त होणारी किमान रक्कम प्रति महिना रु 750 आहे
-प्रत्येकी 2 अनाथ मुलांना एकावेळी 750 रुपये दरमहा दिले जातील
-EPS अंतर्गत, अनाथ मुलांना वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत ही पेन्शन मिळत राहील
-कोणत्याही अपंगत्वाने ग्रस्त असलेल्या मुलासाठी आजीवन पेन्शन प्रणाली
पेन्शन कशी मिळणार?
-EPS साठी, कंपनी आपल्या कर्मचार्यांच्या पगारातून कधीही पैसे कापत नाही.
-कंपनीच्या योगदानाचा फक्त एक भाग EPS मध्ये जमा केला जातो.
-नवीन नियमांनुसार, ही सुविधा 15,000 रुपयांपर्यंत मूळ वेतन असलेल्यांना दिली जाईल.
-एकूण 8.33 टक्के पगार ईपीएसमध्ये जमा होतो
-15,000 रुपये मूळ वेतन मिळाल्यावर, कंपनी ईपीएसमध्ये 1,250 रुपये जमा करते.
वेळ आणि पैसा दोन्हींची बचत
महत्त्वाच्या इतर बातम्या :