RBI Governor Shaktikanta Das Press Conference Highlights:  भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास  (RBI Governor Shaktikanta Das) यांनी आज पतधोरण जाहीर केले. या पतधोरणानुसार, आरबीआयने (Reserve Bank Of India) रेपो दरात 50 बीपीएस म्हणजे 0.50 टक्क्यांची वाढ केली. या रेपो दरावाढीमुळे EMI मध्ये वाढ होणार आहे. आरबीआयने महागाईबाबत चिंता व्यक्त करताना जीडीपी घटणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 


आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे : 


> भारताची अर्थव्यवस्था स्थिर, महागाईची झळ आणखी काहीकाळ सोसावी लागणार 


> कोरोना महासाथ, रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगावर, जागतिक पातळीवर सातत्याने आव्हानात्मक परिस्थिती असतानादेखील भारतीय अर्थव्यवस्थेने त्याचा धैर्याने सामना केला


> कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असल्यानं खर्च घटला


> वर्ष 2023 मध्ये विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज, आधी आरबीआयकडून 7.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त


> जुलै-ऑगस्टमध्ये सेवा क्षेत्रात (Service Sector) चांगली वाढ  


> वर्ष 2022-23 आर्थिक वर्षात महागाई दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज, दुसऱ्या सहामाहीत महागाई  6 टक्के राहण्याची शक्यता आहे. तर 2024 च्या पहिल्या तिमाहीत महागाई दर 5 टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज 


> रुपया दुसऱ्या चलनांच्या तुलनेत मजबूत स्थितीत, सोबतच पुरेशी गंगाजळी उपलब्ध 


> मान्सून लांबल्याने धान्याच्या महागाई वाढ, भाजीपाल्याची महागाई देखील वाढण्याची भीती


 


>> रेपो रेट म्हणजे काय?


ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते त्या दराला रेपो दर म्हणतात. रेपो दर वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे. तर, रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. याचाच अर्थ आरबीआयने रेपो दरात वाढ केली तर सामान्यांच्या कर्जात वाढ होते. 


>> रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? 


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व्ह बँकेकडे पैसा जमा करतात. त्यावर त्यांना मिळणाऱ्या व्याजाला रिर्व्हस रेपो दर म्हणतात. रेपो दर आणि रिव्हर्स व्याज दरात अर्धा ते एक टक्क्यांचा फरक असतो. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


RBI Hike Repo Rate: तुमचा EMI महागला; आरबीआयकडून रेपो दरात 50 BPS ने वाढ