Diwali 2023 : सणासुदीमध्ये भारतात सोने खरेदीला (Gold Buying) पसंती दिली जाते. दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. तुम्हीही यंदाच्या दिवाळीत सोने खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही प्रत्येक्ष सोने खरेदी ऐवजी इतर सोने खरेदीच्या इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकता. डिजियल गोल्ड (Digital Bond), गोल्ड बाँड (Gold Bond) यासारखे काही उत्तम गुंतवणक आणि सोने खरेदीचे पर्याय आहेत.


सॉवरेन गोल्ड (Sovereign Gold Bond Scheme)


आरबीआयने जारी केलेला सॉवरेन गोल्ड बाँड गुंतवणुकीचा पर्याय 2015 पासून उपलब्ध आहे. सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये किमान एक ग्रॅम सोने खरेदी करता येते. प्रत्यक्ष सोने खरेदी कमी करण्यासाठी आरबीआयकडून सॉवरेन गोल्ड ही योजना सुरू करण्यात आली आहे. सॉवरेन गोल्ड बाँडवर वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळते. सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक केली जाऊ शकते. सामान्य नागरिकांसाठी गोल्ड बाँडमधील कमाल गुंतवणुकीची मर्यादा चार किलोग्रॅम आहे. ग्राहक सोनं खरेदी ऐवजी गोल्ड बाँड खरेदी करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांत सॉवरेन गोल्ड बाँड गुंतवणुकीत झपाट्याने वाढली आहे.


गोल्ड ईटीएफ (Gold ETF)


तुम्हाला गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणे महाग वाटत असल्यास, तुम्ही ऑनलाइन गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता. यासाठी तुमचे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. गोल्ड ईटीएफ हा एक गुंतवणूक फंड आहे, ज्याचा व्यापार शेअर्स प्रमाणेच स्टॉक मार्केट एक्सचेंजवर केला जातो.तुम्ही गोल्ड ईटीएफ आणि म्युच्युअल फंड सहजपणे ऑनलाइन खरेदी आणि विक्री करू शकता, या यामधील फायदा आहे. तसेच, यामध्ये तुम्हाला शुद्धतेची काळजी करण्याची गरज नाही.


गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Fund)


गोल्ड फंड हे एक प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत. यामध्ये सोन्याच्या साठ्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुंतवणूक केली जाते. याद्वारे तुम्ही प्रत्यक्ष सोने घरी खरेदी करुन त्याच्या सुरक्षिततेबाबत विचार करण्याशिवाय सोन्यात गुंतवणूक करू शकता. बहुतेक गोल्ड फंड गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे त्याची खरेदी-विक्रीही सोपी आहे. तुम्ही बँकेला, गुंतवणूक एजंटला भेट देऊन किंवा म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने गोल्ड म्युच्युअल फंड खरेदी करू शकता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Dhanteras 2023 : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचं नाणं खरेदी करायच्या विचारात आहात? 'या' गोष्टी ध्यानात ठेवा