Bajaj Finance Share : बजाज फायनान्सने (Bajaj Finance) त्यांच्या एफडीचे (FD) दर वाढवले ​​आहेत. बजाज फायनान्सने (Bajaj Finance) फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit)  रेटमध्ये 15 बीपीएसने वाढ केली आहे. 15 हजार रूपये ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर वाढीव दर लागू होतील. 


आरबीआयकडून रेपो रेटमध्ये (Rbi repo rate) 3 वेळा वाढ  
भारतीय रिझर्व्ह बँकेने (Rbi ) मे महिन्यापासून जवळपास तीन वेळा रेपो (repo rate) दर 1.40 टक्क्यांनी वाढवून 5.40 टक्के वाढवला आहे. त्यानंतर सर्व बँकांनी ठेवींच्या दरात वाढ केली आहे.


असा मिळणार परतावा  
12 ते 23 महिन्यांच्या ठेवींवरील व्याजदर 6.20 टक्क्यांवरून 6.35 टक्के वार्षिक करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीचा व्याजदर 6.45 टक्क्यांवरून 6.60 टक्के झाला आहे. तुम्हाला 22 महिन्यांसाठी FD वर 6.80 टक्के व्याजदर मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 7.05 टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे.


12 ते 60 महिन्यांच्या मुदतीसाठी तुमच्या एफडीचे नूतनीकरण करून प्रती वर्ष 7.75 टक्के पर्यंतचा परतावा मिळवता येतो. 
सिस्टमॅटिक डिपॉझीट प्लानसह छोटी मासिक गुंतवणूक सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रती वर्ष 0.25 टक्के एवढा दर आहे.  5,00,000 रुपयांची  गुंतवणूक करून काढलेल्या एफडीवर ज्येष्ठ नागरिक आणि 60 वर्षांखालील नागरिकांना चांगला परतावा मिळणार आहे. 


जाणून घ्या FD ची महत्वाची वैशिष्ट्ये  



  • ज्येष्ठ नागरिकांसाठी 44 महिन्यांपर्यंतच्या ठेवींवर वार्षिक 7.75 टक्के व्याजदर 

  • 60 वर्षांखालील गुंतवणूकदारांसाठी कमाल 7.50 टक्के व्याजदर

  • 12-60 महिन्यांच्या कालावधीसाठी FD करता येते. 

  • एफडी ठेव रकमेच्या जास्तीत जास्त 75 टक्के कर्ज उपलब्ध आहे.

  • तुम्ही कोणत्याही दंडाशिवाय मुदतपूर्तीपूर्वीच FD खात्यातून पैसे काढू शकता.

  • किमान गुंतवणूक 15 हजार रुपये. जास्तीत जास्त ऑनलाईन गुंतवणूक 5 कोटी रुपये करता येते.  ऑफलाइनमध्ये कोणतीही मर्यादा नाही. 


महत्वाच्या बातम्या


Gold Rate Today : ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरुच; जाणून घ्या आजचे दर 


Petrol-Diesel Price : दिलासा की, खिशाला कात्री? गाडीची टाकी फुल्ल करण्यासाठी किती रुपये मोजाल?


Meesho Grocery Business : Meesho ने भारतातील किराणा व्यवसाय केला बंद; 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले