Insta Personal Loan: पूर्व-संमत कर्ज (प्री-अप्रूव्हड लोन) ही सामान्य कर्जासारखी असतात, अपवाद वगळता तुम्ही तुमच्या कर्जदात्याशी संपर्क साधत नाही. याउलट, हा तुमच्यासाठी कर्जदात्याचा पूर्व-संमत प्रस्ताव आहे. कर्जदात्याशी प्रस्थापित संबंध आणि वेळेवर परतफेडीचा इतिहास तसेच स्थिर उत्पन्न असलेले ग्राहक या प्रकारच्या कर्जासाठीचे प्रमुख उमेदवार असतात. तथापि, कर्जदाता कोणताही पूर्व-संमत कर्ज प्रस्ताव देण्यापूर्वी ग्राहकाच्या पत योग्यतेची संपूर्ण तपासणी करतो हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.


तुम्ही स्वत:च्या अनपेक्षित खर्चांसाठी पूर्व-संमत कर्जाच्या शोधत असलात तर बजाज फायनान्सकडून देण्यात येणारे Insta Personal Loan चा पर्याय तुमच्यादृष्टीने आदर्श ठरतो. सध्याच्या चालू ग्राहकांना पूर्व-संमत प्रस्ताव मिळतात तर नवीन ग्राहक स्वत:साठी पूर्व नियुक्त मर्यादा (प्री-असाईन्ड लिमिट) ठरवू शकतात. मोबाईल क्रमांक आणि ओटीपीद्वारे तुमचा प्रस्ताव तपासता येईल.   
  
पूर्व-संमत कर्जांसाठी पात्रता निकष:


वयोमर्यादा, सिबिल स्कोअर, रोजगाराचा प्रकार आणि मासिक पगार यासह नियमित वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यास पात्र होण्यासाठी ग्राहकांनी अनेक आवश्यकता पूर्ण केल्या पाहिजेत.


दुसरीकडे, पूर्व-संमत कर्जे आधीच मंजूर असल्याने तुम्हाला कोणतेही पात्रता निकष तपासण्याची गरज नाही. तुम्हाला झटपट कर्ज देण्‍यापूर्वी कर्जदात्याने तुमच्या प्रोफाईलचे क्रेडिट स्कोअर, परतफेडीचा इतिहास आणि यासारख्या बाबींसाठी आधीच मूल्यांकन केले आहे.


पूर्व-संमत कर्जाचे लाभ:


पूर्व-संमत कर्ज मिळविण्याचे अनेक लाभ आहेत. खाली सूचीबद्ध केलेली काही वैशिष्ट्यं आहेत, जी तुमच्यासाठी योग्य असू शकतात.


1. जलद वितरण:
ज्या वेगाने निधी वितरित करण्यात येते, हाच पूर्व-संमत वैयक्तिक कर्जाचा मोठा लाभ म्हणावा लागेल. उदाहरणार्थ, बहुतेक प्रकरणांत अर्ज केल्यापासून 30 मिनिटांपासून ते 4 तासांच्या आत बजाज फिनसर्व्ह इन्स्टा पर्सनल लोन तुमच्या बँक खात्यात जमा होते. कारण कर्ज अर्जावरील प्रक्रियेकरिता लागणारा वेळ कमी होतो. कर्जदाता कर्जदाराची पत आणि पात्रता आधीच तपासून बघतो. एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी, आपत्कालीन किंवा अनपेक्षित खर्चाचा सामना करताना, खात्यात रक्कम जमा झाल्यावर ते जीवरक्षक ठरू शकते.


2. त्वरीत प्रक्रिया
ज्या ग्राहकांनी आधीच कर्ज घेतले आहे किंवा कर्जदात्यासोबत विद्यमान कर्ज-संबंध आहेत अशा ग्राहकांना एका सरलीकृत अर्ज प्रक्रियेसह पूर्व-संमत सौद्यांचा लाभ घेता येतो. कर्जदात्याकडे तुमचे केव्हायसी दस्तऐवज आधीच जमा आहेत, परंतु काही प्रकरणांमध्ये तुम्हाला अतिरिक्त दस्तऐवज सबमिट करावे लागतील.


3. लवचिक कर्ज कालावधी
कोणत्याही दोन ग्राहकांच्या गरजा किंवा अटी समान नसतात हे कारण आहे. तुम्हाला एक वर्षाचा परतफेड कालावधी पुरेसा असू शकतो, परंतु दुसर्‍याला अधिक वेळेची आवश्यकता असेल. उदाहरणार्थ, बजाज फिनसर्व्ह इन्स्टा पर्सनल लोन 6 ते 60 महिन्यांपर्यंत परतफेड मुदत देते. प्रक्रियेचा एक भाग म्हणून, तुम्हाला तुमच्या गरजा आणि आर्थिक बाबींना अनुकूल असा कार्यकाळ ठरवता येईल.


वापरकर्त्यांना कोणतीही कागदपत्रे सादर न करता pre-approved loan offers (पूर्व-संमत कर्ज प्रस्ताव)साठी अर्ज करता येतो, परंतु काही कर्जदात्यांना केवळ क्षुल्लक KYC आणि खाते माहितीची आवश्यकता असते. ही प्रक्रिया सोपी आणि जलद आहे. कारण ही कागदपत्रं ऑनलाइन अपलोड केली जाऊ शकतात. ग्राहक कर्जदात्याच्या वेबसाईटवर झटपट कर्ज प्रस्ताव पाहू शकतात आणि त्यांना विविध प्रकारची लक्ष्यं साध्य करण्यात मदतीकरिता काही मिनिटांत कर्ज प्राप्त करण्यासाठी अर्ज करू शकतात.


Disclaimer : हा लेख एक स्पॉन्सर्ड फिचर आहे. ABP किंवा ABP LIVE येथे व्यक्त केलेल्या मतांचे समर्थन करत नाही. या लेखात नमूद केलेल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही कोणत्याही प्रकारे जबाबदार  किंवा उत्तरदायी असणार नाही. तसेच या लेखात सांगितलेली माहिती, घोषणा, पुष्टीकरण इत्यादीसाठी जबाबदार असणार नाही. त्यानुसार वाचकांना हा सल्ला दिला जातोय.