Big Bazaar : उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या आठवड्यात 'बिग बाजार'चा (Big Bazaar) ताबा घेण्यास सुरुवात केली. आता कंपनीने फ्युचर ग्रुपच्या या सर्वात मोठ्या ब्रँडचे नाव बदलण्याची तयारीही केली आहे. किशोर बियानी यांच्या कंपनीच्या रिटेल स्टोअर्सच्या संचालनाची जबाबदारी रिलायन्सने आपल्या हाती घेतली होती. त्यामुळे काही दिवस बिग बझारचे बहुतांशी स्टोअर्स बंद होते.
बिग बाजारचे नाव इतिहासजमा होणार
रिलायन्स रिटेलकडून 'बिग बाजार' असलेल्या ठिकाणी नवीन रिटेल स्टोअर सुरू करण्यात येणार आहे. या नवीन स्टोअरचे नाव 'स्मार्ट बाजार' (Smart Bazaar) होणार आहे. रिलायन्स रिटेल ही कंपन मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीची नवीन कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून रिलायन्स ट्रेंडस्, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स डिजीटल आदी नवीन रिटेल स्टोअर चालवण्यात येत आहेत.
950 ठिकाणी सुरू होणार Smart Bazaar
रिलायन्स रिटेलकडून 950 ठिकाणी आपले स्वत: नवीन स्टोअर सुरू करणार आहे. ही सर्व ठिकाणे रिलायन्सने फ्यूचर ग्रुपच्या नियंत्रणातून आपल्या नियंत्रणात घेतली आहेत. एका वृत्तानुसार, यातील 100 ठिकाणी कंपनी लवकरच 'Smart Bazaar'नावाने स्टोअर्स सुरू होणार आहेत. मात्र, रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपने अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फ्यूचर ग्रुपमध्ये 24 हजार 713 कोटी रुपयांचा करार होऊन जवळपास वर्षाचा काळ लोटला आहे. मात्र, अॅमेझॉनसोबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईमुळे व्यवहार पूर्ण झाला नाही. मागील आठवड्यांपासून रिलायन्स समूहाने आक्रमक भूमिका घेत फ्यूचर ग्रुपचे 'बिग बाजार' स्टोअर्स ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- IPO : फ्लिपकार्टचे सचिन बन्सल नवी टेक्नॉलॉजीचा 3,350 कोटी रुपयांचा आयपीओ आणणार
- PAN Aadhaar Link : पॅन कार्ड आधारकार्डशी लिंक करण्यात अडचण येतेय? 'ही' पद्धत वापरा, 31 मार्चपूर्वी महत्त्वाची कामे उरकून घ्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha