5 Top Banking Apps : आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएम पेमेंट्स बँकेला (Paytm Payments Bank) त्याचे व्यवहार 15 मार्चनंतर बंद करावे लागणार आहेत. त्यामुळे पेमेंट बँकेचा वापर करणाऱ्यांसमोर पुढे काय असा प्रश्न पडला असेल. ग्राहकांना आता डिजिटल पेमेंट्सचा नवीन पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. त्यासाठीच ग्राहकांच्या बँकिंगविषयक गरजा भागवण्यासाठी सर्वांत अनुकूल असे पाच पर्यायांबद्दल आम्ही सांगत आहोत. ते आघाडीचे पर्याय खालीलप्रमाणे,  


1. फोनपे (PhonePe) : फोनपे पैसे चुकते करण्यासाठी, पैशाच्या हस्तांतरासाठी आणि मोबाईल फोन रिचार्ज करण्यासाठी अखंडित व संरक्षित मार्ग देऊ करतो. यूजर-फ्रेण्डली इंटरफेस आणि व्यापाऱ्यांच्या विस्तृत नेटवर्कच्या माध्यमातून फोनपे दैनंदिन व्यवहार देशभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी सुलभ करून देते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आणि विश्वासू बँकिंग सहयोगींचे पाठबळ असलेली आणि फोनपे सेवा खात्रीशीरता व सोय यांची निश्चिती करते. त्यामुळेच ती डिजिटल बँकिंगच्या गरजांसाठी पसंतीचा पर्याय ठरत आहे. 


2. मोबिक्विक (MobiKwik) : अत्याधुनिक एनक्रिप्शन आणि सर्वोच्च दर्जाच्या सुरक्षितता सुविधांच्या जोरावर मोबिक्वि‍क वापरकर्त्याला सुरक्षित व्यवहार करण्याची मुभा देते. त्यामुळे आर्थिक उपक्रम निश्चित मनाने करणे शक्य होते. मोबिक्विक वॉलेटसह अनेक डिजिटल वित्तीय सोल्यूशन्सचा सर्वसमावेशक समूह मोबिक्विक देऊ करते. त्यामुळे रिचार्ज ते बिले चुकती करणे आणि ऑनलाइन खरेदी अशी व्यवहारांची विस्तृत श्रेणी शक्य होते. मोबिक्विक यूपीआय एकात्मीकरणामुळे दोन बँक खात्यांतील हस्तांतर व्यवहार अखंडितपणे होतात. वापरकर्त्याला लवचिकतेने व्यवहार करता येतात. 


झिप पे लेटरच्या माध्यमातून मोबिक्विक ग्राहकांना एखादी गोष्ट खरेदी करून नंतर पैसे देण्याची सुविधा देते. त्यामुळे ग्राहक तत्काळ पैसे चुकते करण्याची चिंता सोडून मुक्तपणे खरेदी करू शकतात. मोबिक्विक झिप ईएमआय सुविधाही पुरवते. त्याद्वारे वेतनदार व स्वयंरोजगारित व्यक्तींना 10,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. त्यासाठी ते 3 महिने ते 24 महिन्यांच्या मुदतीतील ईएमआयचे पर्याय निवडू शकतात. 


3. अमेझॉन पे (Amazon Pay) : अमेझॉन पे अखंडित व्यवहारांसाठी सर्वसमावेशक सेवांचा समूह देऊ करते. अमेझॉन परिसंस्थेत एकात्मीकरण झाल्यामुळे वापरकर्ते विनासायास काही क्लिक्समध्ये खरेदी करू शकतात, बिले चुकती करू शकतात आणि मोबाइल फोन रिचार्ज करू शकतात. अमेझॉन वॉलेट पेमेंट पद्धती स्टोअर करण्याचे तसेच सुरक्षितपणे व्यवहार व्यवस्थापित करण्याचे सोयीस्कर मार्ग पुरवते. अमेझॉनच्या काटेकोर सुरक्षितता मानकांद्वारे ही सेवा एक संरक्षित व सोयीस्कर प्लॅटफॉर्म देऊ करते. अमेझॉन पेद्वारे कोट्यवधी वापरकर्ते निश्चितपणे व्यवहार करू शकतात. 


4. गूगल पे (Google Pay) : वापरकर्त्यांना सुरक्षितपणे पैसे पाठवण्याची, बिले चुकती करण्याची व ऑनलाइन खरेदी करण्याची क्षमता देऊन गूगल पेच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार सुलभ केले आहेत. गुगल वॉलेटच्या माध्यमातून ही सेवा तुम्हाला दैनंदिन आवश्यक बाबी सुरक्षितपणे उपलब्ध करून देते. वापरकर्ते पेमेंट पद्धती साठवू शकतात आणि व्यवहार विनासायास व्यवस्थापित करू शकतात. गूगलच्या ठोस सुरक्षितता उपायांच्या तसेच नवोन्मेषाप्रती बांधिलकीच्या जोरावर, गूगल पे जगभरातील कोट्यवधी वापरकर्त्यांना अखंडित व खात्रीशीर पेमेंट अनुभव देते. 


5. जिओ पेमेंट्स बँक (Jio Payments Bank) : जिओ पेमेंट्स बँक आपल्या यूजर-फ्रेण्डली मोबाइल अॅपद्वारे  बँकिंग व पेमेंट सोल्यूशन्सची वैविध्यपूर्ण मालिका देऊ करते. पारंपरिक बँकिंग सुविधांशिवाय, वापरकर्ते जिओ वॉलेटच्या सोयीस्कर सुविधांचा लाभ घेऊन अखंडित व्यवहार व संरक्षित निधी व्यवस्थापन करू शकतात. उपलब्धता व नवोन्मेष यांच्याशी बांधिलकी राखून, जिओ पेमेंट्स बँक देशभरातील वापरकर्त्यांना विनासायास वित्त व्यवस्थापनाची मुभा देते.


ही बातमी वाचा: