मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) ठेवी घेण्यास बंदी घातल्यानंतर पेटीएम यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांना असंख्य प्रश्न पडले आहेत. पेटीएम बँकेवर घातलेल्या बंदीनंतर पेटीएमवरून स्कॅनिंग करून (UPI) पैसे पाठवता येणार का? पेटीएमच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येणार का? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं आता आरबीआयने (RBI Released FAQ) दिली आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने FAQ जारी केले आहे.
पेटीएम बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांच्या चिंता दूर करण्यासाठी त्यांनी FAQ जारी केले आहेत. यामध्ये ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण आरबीआयने दिले आहे. या FAQ द्वारे UPI, IMPS आणि NCMC कार्डशी संबंधित प्रश्नांवर स्पष्टता देण्यात आली आहे.
पेटीएम बँकेशी संबंधित FAQ खालीलप्रमाणे,
प्रश्न - मी 15 मार्च नंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात UPI आणि IMPS करू शकतो का?
उत्तर - नाही, तुम्ही 15 मार्च नंतर तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही.
प्रश्न - मी 15 मार्च नंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यातून UPI आणि IMPS द्वारे पैसे काढू शकतो का?
उत्तर - होय, तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकाल.
प्रश्न - मी पेटीएम पेमेंट बँक खाते वापरून 15 मार्च नंतर भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे पेमेंट करू शकतो का?
उत्तर - होय, तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात जमा केलेले पैसे बिल भरण्यासाठी वापरू शकता. परंतु तुम्ही तुमच्या खात्यात किंवा वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकणार नाही. त्यामुळे 15 मार्चपूर्वी बीबीपीएससाठी इतर कोणतेही बँक खाते वापरण्याचा सल्ला आहे.
प्रश्न - मी आधार कार्डद्वारे बायोमेट्रिक पेमेंट सिस्टम (AePS प्रमाणीकरण) वापरून 15 मार्च नंतर पेटीएम पेमेंट्स बँक खात्यातून पैसे काढू शकतो का?
उत्तर - होय, तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँक खात्यात जमा केलेले पैसे या प्रणालीद्वारे काढू शकता.
प्रश्न - माझ्याकडे पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC कार्ड) आहे. मी 15 मार्च नंतरही वापरू शकतो का?
उत्तर – होय, तुम्ही NCMC कार्ड वापरू शकता. परंतु 15 मार्चनंतर तुम्ही ते टॉप अप करू शकणार नाही. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी इतर कोणत्याही बँकेने जारी केलेले कार्ड वापरा.
प्रश्न - माझ्याकडे पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेले नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आहे. 15 मार्च नंतर मी ते टॉप अप किंवा रिचार्ज करू शकतो का?
उत्तर - नाही, तुम्ही 15 मार्च नंतर NCMC कार्ड टॉप अप किंवा रिचार्ज करू शकणार नाही. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी इतर कोणत्याही बँकेने जारी केलेले कार्ड वापरा.
प्रश्न - मी पेटीएम पेमेंट्स बँकेने जारी केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची शिल्लक इतर कोणत्याही बँकेच्या एनसीएमसी कार्डमध्ये हस्तांतरित करू शकतो का?
उत्तर - नाही, NCMC कार्डमध्ये शिल्लक हस्तांतरणाची सुविधा नाही. त्यामुळे त्यात जमा झालेले पैसे वापरावेत. शिल्लक राहिल्यास, पेटीएम पेमेंट्स बँकेकडून परतावा मागता येईल.
ही बातमी वाचा :