Patanjali News : पतंजली विद्यापीठ आणि पतंजली संशोधन संस्थेनं देशातील तीन प्रतिष्ठित विद्यापीठांसोबत एक ऐतिहासिक करार केला आहे. पतजंली शिक्षण, वैद्यक, योग, आयुर्वेद, कौशल्य विकास आणि भारतीय ज्ञान परंपरेच्या क्षेत्राला चालना देणार आहे. यासाठी लागणारे सहकार्य करणार आहे. 

Continues below advertisement


पतंजलीने कोणत्या विद्यापीठांसोबत केलाय करार ?


राजा शंकर शाह विद्यापीठ, छिंदवाडा (मध्य प्रदेश)


हेमचंद यादव विद्यापीठ, दुर्ग (छत्तीसगढ़)


महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठ, चित्रकूट (मध्य प्रदेश)


पतंजलीच्या राष्ट्रनिर्माण कार्याचं सर्वांकडून कौतुक 


या कार्यक्रमात तीनही विद्यापीठांचे कुलगुरू प्रा. इंद्र प्रसाद त्रिपाठी, डॉ. संजय तिवारी आणि प्रो. भरत मिश्रा उपस्थित होते. त्यांनी पतंजलि यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्यांचे कौतुक केले. पतंजलि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलिकडून चालविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांत इतिहास लेखन, वनस्पति शास्त्र, निदान ग्रंथ आणि विश्व भेषज संहितेच्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी म्हटले: “ऋषि क्रांती, योग क्रांती आणि शिक्षण क्रांतीचा हा प्रवास लाखो लोकांना लाभ देणार आहे.”


भारतीय संस्कृती आणि विज्ञानाला जागतिक पटलावर


भारतीय शिक्षण व परंपरा सुदृढ करण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पतंजली विद्यापीठाच्या या प्रयत्नांमुळे देशात शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात नवे आयाम उभे राहतील. हे सहकार्य फक्त ज्ञानविनिमयाला चालना देणार नाही, तर भारतीय संस्कृती आणि विज्ञानाला जागतिक पटलावर नेणार आहे.


या उपक्रमामुळे फक्त शैक्षणिक दर्जाच सुधारणार नाही, तर देशाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि जागतिक स्तरावर प्रसार होण्यासही मदत होईल. या MoU अंतर्गत संयुक्त संशोधन, कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम योजले जातील, ज्यामुळे विद्यार्थी व संशोधक यांना नवीन संधी प्राप्त होतील.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


पंचकर्म आणि योग: निसर्गोपचारांनी दीर्घकालीन आजारांचा समूळ नाश; लाखो लोकांचे बदलले जीवन