Online Food Delivery : विविध पदार्थांची किंवा अन्नाची ऑनलाईन डिलिव्हरी (Online Food Delivery) करताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा कर्मचाऱ्यांसह संबंधीत हॉटेलला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. असाच काहीसा प्रकार गुजरातमधील अहमदाबादमध्ये (Ahmedabad) घडलाय. एका महिलेने चीज सँडविच (Cheese Paneer Sandwich) ऑनलाईन ऑर्डर केले होते. मात्र, या महिलेला चीज सँडविच न मिळता चिकन सँडविच (Chicken sandwich)  मिळाले आहे. या घटनेनंतर संबंधीत महिलेनं तब्बल 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई रेस्टॉरंटला मागितली आहे. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय आहे. 


पनीर टिक्का सँडविच समजून खाल्ले चिकन सँडविच 


अहमदाबादमध्ये राहणाऱ्या निराली या महिलेनं पनीर टिक्का सँडविच ऑर्डर केले होते. मात्र, चुकून या महिलेला चिकन मिळाले. ही महिला शुद्ध शाकाहारी आहे. त्या महिलेनं पनीर टिक्का सँडविच समजून चिकन सँडविच खाल्ले. पण सँडविच फार कडक लागते म्हणून तिने व्यवस्थित बघितले असता, तिला सर्व प्रकार लक्षात आला. विशेष म्हणजे या महिलेनं संपूर्ण आयुष्यात कधीही मौसांहार केला नव्हता. या घटनेनंतर महिलेनं रेस्टॉरंटकडे नुकसानभरपाई म्हणून 50 लाख रुपयांची मागणी केली आहे. 


अन्न विभागानं रेस्टॉरंटला ठोठावला 5000 रुपयांचा दंड


दरम्यान, या प्रकाराची अन्न विभागानं देखील दखल घेतलीय. अन्न विभागानं  रेस्टॉरंटला 5000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. संबंधित महिलेनं या सर्व प्रकाराची तक्रार अहमदाबाद महापालिकेच्या उप आरोग्य अधिकाऱ्याकडे केली होती. ही घटना भयंकर असल्याचे तिने यामध्ये सांगितले होते. रेस्टॉरंटला पाच हजार रुपयांचा दंड पुरेसा नाही. मला नुकसानभरपाई म्हणून 50 लाख रुपये मिळावे अशी मागणी निरालीने केली आहे. दरम्यान, रेस्टॉरंटने याबाबत कोणतीही प्रक्रिया दिलेली नाही. 


निरालीचे अनेकांनी केले कौतुक


दरम्यान, या घटनेनंतर निरालीचे अनेकांनी कौतुक होत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत. काही जणांनी कौतुक केलं आहे, तर काही जणांनी विरोधातही कॉमेंट्स दिल्या आहेत. दरम्यान, अनेक ग्राहकांना त्यांच्या हक्काची माहितीच नसल्याचे निरालीने सांगितले आहे. दरम्यान, या प्रकरणी आता संबधीत महिला निरालीने रेस्टॉरंटकडे 50 लाख रुपयांची मागणी केली आहे. यावर आता रेस्टॉरंट काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Swiggy : स्विगीवरून जेवण मागवताय? लवकरच त्यावर अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल, स्विगीकडून प्लॅटफॉर्म फी दुप्पट करण्याची शक्यता