Gold Price : यंदाच्या दिवाळीच्या सणानिमित्त सोन्याच्या (Gold) मागणीत चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने भारतातील गोल्ड मार्केटमध्ये तेजी येणार असल्याचा अंदाज सराफ बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सोन्याच्या या वाढत्या मागणीमुळे येत्या काळात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या दिवाळीत सोनं तुलनेन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याच्या मागणीत 47 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती जागतिक सुवर्ण परिषदेनं (World Gold Council) दिली आहे. त्यातच आता दिवाळीसारखे सणासुदीचे दिवस असल्याने सोन्याची मागणी वाढणार असल्याचं WGC चा अंदाज आहे. येत्या काळात लग्न सराईचा मोसम सुरु झाल्याने सोन्याच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे सोन्याच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे एकेकाळी 56 हजारांवर असलेलं सोनं 45 हजारांच्या जवळ आलं होतं. आता कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा होत असल्याने त्याच्या मागणीतही हळूहळू वाढ होताना दिसत आहे. येत्या काळात सोन्याच्या मागणीत 15 ते 20 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असून लसीकरणही मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. चौथ्या तिमाहीत सोन्याची आयात जास्त होणार नाही. कारण व्यापारी हे सणासुदीसाठी सोन्याचा स्टॉक अगोदरच तयार करतात. कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असून सर्व पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे सोन्याची मागणी देखील पूर्वीप्रमाणे वाढत आहे.
महत्वाच्या बातम्या :