Relationship Tips : असं म्हणतात ना, नातं निर्माण करणं सोप्प आहे, पण ते आयुष्यभरासाठी निभावणं खूप कठीण असतं, नातं कोणतही असो, ते फक्त आणि फक्त विश्वास आणि प्रेमाच्या आधारावर जगतं. जेव्हा जेव्हा नातेसंबंधांचा विचार केला जातो तेव्हा विश्वास हा सर्वात महत्वाचा दुवा मानला जातो. पती-पत्नीमध्ये कोणत्याही प्रकारचा पडदा नसावा, असे म्हटले जाते. दोघांनीही एकमेकांपासून काहीही लपवू नये. पण, असे करणे खरंच योग्य आहे का? पती-पत्नीने एकमेकांना सर्व काही सांगावे का? नाते कोणतेही असो, काही गोष्टी ज्या तुमच्या नात्यासाठी हानिकारक असतील त्या गुप्त ठेवायला हरकत नाही. तुमच्या नात्यासाठी कोणत्या गोष्टी गुपित ठेवणं चांगल्या आहेत? एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार मानसशास्त्रज्ञ डॉ. चंद्रिमा मिश्रा मुखर्जी याबद्दल माहिती देत आहेत.


 


जुने संबंध गुप्त ठेवा


जोडीदारापासून काही लपवू नये या विचारामुळे काही लोक आपल्या जुन्या नात्यांबद्दल सर्व काही सांगतात. पण हे करू नका. प्रत्येकाचा स्वतःचा भूतकाळ असतो. त्याची सावली आज तुमच्यावर पडेलच असे नाही. काळाबरोबर पुढे जाणे आणि जुन्या नात्यातून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. आणि जेव्हा तुम्ही आधीच जुन्या नात्यातून बाहेर आलात तेव्हा त्याचा उल्लेखही करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराप्रती पूर्णपणे एकनिष्ठ असाल, पण तुमच्या जुन्या नात्याबद्दल बोलत असताना तुमच्या तोंडातून असे काहीतरी बाहेर पडू शकते जे तुमच्या नात्यासाठी हानिकारक ठरू शकते. मानसशास्त्र सांगते की अशा गोष्टींमुळे जोडीदाराच्या मनात अनेकदा तुलनेची भावना निर्माण होते, जी आयुष्यभर सावलीसारखी राहते. जरी काही कारणास्तव त्याचा उल्लेख केला असला तरीही, एक किंवा दोन ओळीत संभाषण समाप्त करा.


 


 


जोडीदाराचे कौतुक करताना काळजी घ्या


तुमच्या जोडीदाराच्या मित्रांची स्तुती सावधगिरीने करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा एखादा मित्र हॉट किंवा स्वीट वाटेल, पण ही भावना तुमच्या मनात गुप्त ठेवा. कधीकधी ही स्तुती तुमच्या नात्यावर परिणाम करू लागते. जर तुमचा जोडीदार एखाद्या मित्राबद्दल तुमचे मत विचारत असेल तरीही तुमच्या काही भावना गुप्त ठेवा.


 


तुमच्या काही सवयी लपवणे महत्त्वाचे


प्रत्येक व्यक्तीची जगण्याची स्वतःची पद्धत असते, जेव्हा तुम्ही एकटे असतो. तेव्हा या गोष्टी गुप्त ठेवल्या पाहिजे. हे शक्य आहे की जेव्हा तुम्ही घरी एकटे असता तेव्हा तुम्ही टीव्ही पाहताना संपूर्ण केक खातात किंवा भावनिक चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही रडता. या गोष्टी स्वतःपुरत्या मर्यादित ठेवा. समोरच्याला तुमच्या भावना कळतीलच असे नाही. अशा परिस्थितीत जर तुमच्या जोडीदाराने या बाबतीत तुमची खिल्ली उडवली तर तुमच्या मनात कायमची गाठ निर्माण होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर नात्यात छोटीशी शंका आली तरी विचार न करता बोलू नका. जर एखाद्या शंकेचे कालांतराने निराकरण झाले असेल तर त्याचा पुन्हा उल्लेख करू नये.


 


तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबाबद्दल बोलताना सावधान...


तुमच्या कुटुंबातील एखाद्याला तुमचा जोडीदार आवडत नसेल तर ते गुप्त ठेवा. तुम्हाला जोडीदाराच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आवडत नसली तरी त्या व्यक्तीबद्दल काही सांगण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या जोडीदाराची कोणतीही सवय आवडत नसेल आणि ती सवय बदलता येत नाही हे तुम्हाला माहीत असेल तर त्याबद्दल काहीही न बोललेलेच बरे. तुमच्या जोडीदाराने याबाबत विचारले तरी खरे सांगण्याची गरज नाही.


 


नात्यात या गोष्टी लक्षात ठेवा


तुमच्या जोडीदाराला कधीच सांगू नका की तुम्हाला ते आधी आवडत नव्हते. तुमच्या जोडीदाराबाबत जर कोणी नातेवाईक कधी चुकीचे बोलले असतील तर त्या गोष्टी गुप्त ठेवा. तुमच्या जोडीदाराचे यश अपेक्षेप्रमाणे नसले तरी त्यावर भाष्य करू नका. नात्यात तुमची फसवणूक झाली असेल तर तेही गुप्त ठेवा. अशा गोष्टी जोडीदाराला सांगितल्याने तुमच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.


 


हेही वाचा>>>


Relationship Tips : पती-पत्नीच्या नात्यात विष पसरायला वेळ लागणार नाही, नातेवाईकांच्या 'या' 5 सल्ल्यांपासून सावधान! मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )