Income Tax Return: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) अध्यक्षा संगीता सिंह यांनी शनिवारी सांगितले की, आर्थिक वर्ष 2020-21 च्या तुलनेत 2021-22 या आर्थिक वर्षात आयकर रिटर्नच्या संख्येत वाढ झाली आहे. संगीता सिंह यांनी सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात आयकर रिटर्नची संख्या 7.14 कोटी होती, जी मागील वर्षी 6.9 कोटी होती. त्यामुळे आयकर रिटर्नच्या संख्येत स्पष्ट वाढ दिसून येत आहे.


आयकर रिटर्नच्या संख्येत वाढ होत आहे: CBDT प्रमुख


त्या म्हणाल्या की, "करदात्यांची संख्या आणि सुधारित रिटर्न भरणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे." सीबीडीटी प्रमुख म्हणाल्या की, बोर्ड कर संकलनात वाढ करत आहे. देशातील आर्थिक विकास प्रगतीपथावर असताना अशी परिस्थिती उद्भवते.


देशाच्या अर्थव्यवस्थेची डिजिटल इंडियाकडे वाटचाल 


संगीता सिंह म्हणाल्या की,"आर्थिक गतिविधी वाढत असल्यास खरेदी आणि विक्रीमध्ये वाढ होईल. जोपर्यंत अर्थव्यवस्था विकसित होत नाही, तोपर्यंत कराचे प्रमाण वाढू शकत नाही.'' त्या म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाच्या दिशेने घेतलेल्या पुढाकारामुळे विभागाच्या कर भरणामध्येही वाढ होताना दिसत आहे." त्या पुढे म्हणाल्या, कोविड-19 महामारीच्या काळात लोक अधिक डिजिटल पेमेंट करू लागले आहेत.


करदात्यांना माहिती देण्याचा उपक्रमही त्यांना वेळेवर कर भरण्याबाबत जागरूक करण्यात हातभार लावत आहे, असं त्या म्हणाल्या. संगीता सिंह म्हणाल्या, आम्ही अलीकडच्या वर्षांत मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन देखील केले आहे. CBDT चेअरमनच्या मते, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कर संकलन 14 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जे आर्थिक वर्ष 2019-20 च्या कर संकलनापेक्षा खूप चांगले आहे.


महत्वाच्या बातम्या :