मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात NSE CO-LOCATION प्रकरणी सुरक्षा अपीलीय न्यायाधिकरणाने (Securities Appellate Tribunal-SAT) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे. सुरक्षा अपील न्यायाधिकरणाने 625 कोटींच्या वसुलीचा आदेश रद्द केला आहे.
आपल्या आदेशात सुरक्षा अपील न्यायाधिकरणाने म्हटले आहे की, एनएसईने कोणताही अवैध नफा कमावलेला नाही. त्यामुळे नॅशनल स्टॉक एक्सचेंजला (NSE) फक्त 100 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. परंतु न्यायाधिकरणाने या प्रकरणाची बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशान्वये बाजार नियामकाला नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) अधिकारी आणि दलाल यांच्यातील संगनमताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (NSE) चेअरमन आणि CEO यांनाही दिलासा
सुरक्षा अपील न्यायाधिकरणानेही आपल्या आदेशात NSE चेअरमन आणि CEO यांना दिलासा दिला आहे. चेअरमन आणि सीईओ यांचे पगार थांबवण्याचा आदेश सॅटने फेटाळला आहे. याशिवाय अध्यक्ष आणि सीईओवरील बंदीही कमी करण्यात आली आहे.
NSE co location case : 625 कोटींचे डिसॉर्जमेंट ऑर्डर फेटाळले
याआधी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 625 कोटी रुपयांच्या डिसगर्जमेंटचा आदेश देण्यात आला होता. मात्र सॅटने हा आदेश फेटाळला. सुरक्षा अपील न्यायाधिकरणाने सांगितले की नॅशनल स्टॉक एक्सचेंज( NSE) ने सह-स्थानात अवैध नफा कमावला नाही. त्यामुळे 625 कोटींची बेमुदत वसुली करणे योग्य नाही. पण SAT ने आपल्या आदेशात म्हटले आहे की लोड बॅलन्सर न बसवणे ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजची चूक आहे.
शेअर बाजारात तांत्रिक अडचण आल्यास ट्रेडिंगची वेळ वाढणार
गुंतवणूकदार, ब्रोकरच्या दृष्टीने सेबीने मोठा निर्णय घेतला आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये तांत्रिक अडचण आल्यास ट्रेडिंगचा वेळ वाढवण्यात येणार आहे. याबाबत भांडवली बाजार नियामक सेबीकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. तांत्रिक अडचणींची माहिती त्वरीत बाजारात सहभागी असलेल्यांना 15 मिनिटांच्या आत ब्रॉडकास्ट मॅसेज अथवा वेबसाइटने द्यावी लागणार आहे. सेबीला ही माहिती दिल्यानंतर ट्रेडिंगची वेळ देखील वाढवली जाऊ शकते. स्टॉक एक्सचेंजमधील ट्रेडिंग बंद होण्याच्या एक तास आधीच बिघाड दुरुस्त झाल्यास बाजारातील व्यवहाराच्या वेळेत बदल होणार नाही.
ही बातमी वाचा: