Stock Market  : भारतीय शेअर बाजारासाठी आठवड्याचा आजचा पहिला दिवस चांगला राहिला. जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे सुरूवातीला तेजीत सुरू झालेला शेअर बाजार तेजीनेच बंद झाला. बँकिंग आणि आयटी शेअर्समधील तेजीमुळे बाजारात तेजी दिसून आली. आज व्यवहार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा ( BSE ) सेन्सेक्स 320 अंकांच्या वाढीसह 60,941 वर बंद झाला. तर राष्ट्रीय ( NSE) निफ्टी 91 अंकांच्या उसळीसह 18,119 अंकांवर बंद झाला. 


आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी ऑइल आणि गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी झाली तर मेटल, रिअल इस्टेट, इन्फ्रा क्षेत्रातील शेअर्स घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 32 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 18 शेअर्स तोट्यासह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्समधील 19 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 11 शेअर्स तोट्यासह बंद झाले. 


Stock Market  : वाढलेले शेअर्स


आजच्या ट्रे़डिंग सत्रात एचयूएलचा शेअर्स 1.89 टक्क्यांनी वाढला. तर सन फार्मा 1.85 टक्के, टीसीएस 1.56 टक्के इंफोसिस 1.48 टक्के, टेक महिंद्रा 1.45 टक्के, एसबीआय (SBI ) 1.41 टक्के, टाटा मोटार्स ( Tata  Motors ) 1.33 टक्के, HCL Tech 1.24 टक्के, Kotak Mahindra 1.10 टक्टे , भारतीय एरटेल ( Airtel ) 1.109 टक्के वाढला.   


Stock Market  : घसरलेले शेअर्स 


आज घसरलेल्या समभागांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट 4.62 टक्क्यांनी घसरला. तर एनटीपीसी 0.89 टक्के, टाटा स्टील 0.73 टक्के, लार्सन 0.58 टक्के, रिलायन्स 0.54 टक्के, टायटन 0.26 टक्के, मारुती सुझूकी 0.16,  आयसीआयसीआय बँकेचा शेअर्स 0. 05 टक्क्यांनी घसरला.    


Stock Market  : गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ 


आजच्या व्यवहारात, BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 280.81 लाख कोटी रुपये झाले आहे. हे मार्केट गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 20 जानेवारी रोजी 280.24 लाख कोटी रुपये होते. म्हणजे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 57000 कोटींची वाढ झाली आहे. 


Stock Market  : सुरूवातीपासूनच शेअर बाजारात तेजी


आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. ओपनिंगपासूनच बॅंकिंग क्षेत्रातील खरेदीदारांचा उत्साहा चांगला होता. त्यामुळे शेअर बाजार तेजीने सुरू झाला. बीएसी सेंसेक्स 234 अंकांच्या उसळीसह 60, 855 ने सुरूवात झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निप्टीत 72 अंकांच्या उसळीसह 18096 वर ओपन झाला. त्यांतर व्यवहार संपताना मुंबई शेअर बाजाराचा ( BSE ) सेन्सेक्स 320 अंकांच्या वाढीसह 60,941 वर बंद झाला. तर राष्ट्रीय ( NSE) निफ्टी 91 अंकांच्या उसळीसह 18,119 अंकांवर बंद झाला. 


महत्वाच्या बातम्या 


Money Making Tips : 'हे' पाच मार्ग तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात, फक्त करा योग्य नियोजन