NPS Rule Change : पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) आणि इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) या राष्ट्रीय पेन्शन योजनेतील गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे, पीएफआरडीए आणि आयआरडीएआयकडूनही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जर तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीसाठी NPS मध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला PFRDA आणि IRDAI द्वारे अलीकडेच बदललेले नियम माहित असले पाहिजेत. जाणून घ्या


 


NPS नामांकनाबाबत बदललेले नियम
सरकारी आणि खाजगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन नियामकाने ई-नॉमिनेशनची प्रक्रिया बदलली आहे. नव्या नियमानुसार आता तुमचा अर्ज मंजूर किंवा नाकारण्याचा अधिकार नोडल ऑफिसरला असेल. जर नोडल ऑफिसरने तुमच्या ई-नामांकन अर्जावर 30 दिवसांच्या आत कोणतीही कारवाई केली नाही, तर तुमचा अर्ज आपोआप सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी (CRA) कडे जाईल आणि तो स्वीकारला जाईल. हा नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आला आहे.


 


मॅच्युरिटीवर अॅन्युइटीसाठी वेगळा फॉर्म घ्यावा लागणार नाही
NPS मधील गुंतवणूक सुलभ करण्याच्या उद्देशाने, RRDAI नियमितपणे नियमांमध्ये बदल करत आहे. अलीकडेच, RRDAI ने मॅच्युरिटीच्या वेळी अॅन्युइटी घेण्यासाठी स्वतंत्र फॉर्म भरण्याची प्रणाली काढून टाकली आहे.


 


डिजिटल जीवन प्रमाणपत्र
पेन्शन सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक पेन्शनधारकाला दरवर्षी पेन्शन प्राधिकरणाकडे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. आता जीवन सन्मान सेवेचा वापर करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करता येणार आहे. यासोबतच विमा नियामकाने सर्व विमा कंपन्यांना आधार- वेरिफाईड जीवन प्रमाणपत्र स्वीकारण्यास सांगितले आहे.


 


क्रेडिट कार्डद्वारे NPS मध्ये योगदान
PFRDA ने जारी केलेल्या आदेशानुसार, 3 ऑगस्ट 2022 पासून, टियर 2 शहरांमधील NPS खातेधारक यापुढे क्रेडिट कार्डद्वारे NPS मध्ये योगदान देऊ शकणार नाहीत. पण ही सुविधा टियर 1 शहरांतील खातेधारकांसाठी अद्यापही उपलब्ध आहे.


गुंतवणूकदारांना निर्णय घेणे होईल सोपे


पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने याबाबत जून महिन्यात एक परिपत्रक जारी केले होते. ज्यात गुंतवणूकदारांना एनपीएस गुंतवणुकीतील जोखीम प्रोफाइलबद्दल माहिती देण्याचे नियम दिले होते, जेणेकरून गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता वाढेल आणि त्यांना जास्तीत जास्त परतावा मिळू शकेल. तसेच, गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे निर्णय घेणे सोपे होईल.


इतर महत्वाच्या बातम्या


Tata Steel : मंदीची चाहूल? टाटा स्टीलच्या तिमाही नफ्यात 90 टक्क्यांची घसरण, नफा 12,547 कोटींवरुन थेट 1,297 कोटींवर