HDFC Bank Hikes Fixed Deposit Rates: जे आपले कष्टाचे पैसे बँकेत मुदत (Fixed Deposit) ठेवीच्या रूपात ठेवतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. RBI च्या रेपो दरात (Repo Rate) वाढ करण्याच्या निर्णयानंतर HDFC बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा वाढवण्याची घोषणा केली आहे. एचडीएफसी बँकेने 17 जून 2022 पासून एफडी दरात 25 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर (Fixed Deposit) लागू आहेत.


एफडीच्या दरात 25 बेसिस पॉईंट्सची वाढ


HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, 7 ते 29 दिवसांच्या FD वर व्याजदर 2.50 टक्क्यांवरून 2.75 टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल. 30 ते 90 दिवसांच्या एफडीवर 3 टक्क्यांऐवजी 3.25 टक्के व्याज मिळेल. 91 दिवस ते 6 महिन्यांच्या FD वर 3.50 टक्क्यांऐवजी 3.75 टक्के व्याज मिळेल. 1 ते 2 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 5.10 टक्क्यांऐवजी 5.35 टक्के व्याज मिळेल. 2 वर्षे एक दिवस ते 3 वर्षे मुदतीच्या FD वर 5.50 टक्के व्याज मिळेल, ज्यावर पूर्वी 5.40 टक्के व्याज मिळायचे. 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे मुदतीच्या FD वर 5.70 टक्के व्याज मिळेल, ज्यावर पूर्वी 5.60 टक्के व्याज मिळायचे.


इतर बँकाही एफडी व्याजदर वाढवतील


यापूर्वी 15 जून 2022 रोजी, HDFC बँकेने व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याची घोषणा केली होती. मात्र आरबीआयने रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक बँकांनी मुदत ठेवींमध्ये वाढ केली आहे. असे मानले जात आहे की, इतर अनेक बँका FD वर व्याजदर वाढवू शकतात.


महत्त्वाच्या बातम्या: