मुंबई: रुस्तमजी समुहाची कंपनी कीस्टोन रिअल्टर्सने आपला आयपीओ आणण्यासाठी भारतीय प्रतिभूति विनियम बोर्डाकडे (Securities Exchange Board of India) अर्ज दाखल केला आहे. जवळपास 850 कोटी रुपायांची ही आयपीओची योजना आहे. या आयपीओ मध्ये 700 कोटी रुपयांचे नवे इक्विटी शेअर्स आणि शेअरहोल्डर्स आणि प्रवर्तकांच्या 150 कोटींच्या ऑफर-फॉर-सेलचा यामध्ये समावेश असेल.


आयपीओच्या ऑफर फॉर सेलसाठी प्रवर्तक शेअरहोल्डर रुस्तम ईराणी हे आपले 75 कोटींचे शेअर्स विकरणार आहेत. तर पर्सी सोराजी चौधरी 37.50 कोटी तर चंद्रेश दिनेश मेहता 37.50 कोटींचे शेअर्स विकरणार आहेत.


अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि credit suisse securities (India) हे आयपीओसाठी बुक रनिग लीड मॅनेजर असणार आहेत अशी माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आयपीओच्या माध्यमातून उभे केलेले पैसे हे कंपनी आणि कंपनीची उपकंपनी यांचे कर्ज फेडणे, कंपनी अधिग्रहण योजना आणि कंपनीच्या इतर सामान्य कामकाजासाठी वापरण्यात येणार आहे.


कीस्टोन रिअल्टर्स कंपनी ही एक मोठी रिअल इस्टेट डेव्हलपर्स आहे. रुस्तमजी ब्रँडच्या नावाखाली या कंपनीचे 31 मार्च 2022 पर्यंत 31 मोठी प्रोजेक्ट पूर्ण झालेले आहेत तर 12 प्रोजेक्ट सुरु आहेत. मुंबई आणि एमएमआर विभागात कंपनीचे 19 प्रोजेक्ट होते.


31 मार्च 2022 पर्यंत विकसित निवासी इमारती, प्रीमियम गेट इस्टेट, टाउनशिप, कॉर्पोरेट पार्क, शाळा आणि इतर अनेक रिअल इस्टेट प्रकल्प जवळपास 20.5 दशलक्ष खर्चून पूर्ण केले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: