Indian ipo market :  आत्तापर्यंत  जागतिक आयपीओच्या बाजाराच्या मंदीची झळ ही भारताच्या बाजाराला लागलेली नाही. कारण भारतात प्राइमरी मार्केटमध्ये गेल्या 5 महिन्यात आत्तापर्यंत 16 कंपन्यांमध्ये 40 हजार कोटी अधिकची गुंतवणूक करण्यात आल्याची आकडेवारी एका वेबसाईटने प्रसिद्ध केली आहे. 


युरोपमध्ये सुरु असलेली भू-राजकीय परिस्थिती, वाढलेले व्याजदर आणि गुतंवणूकदारांची जोखीम घेण्याची कमी झालेली क्षमता अशा काही कारणांच्यामुळे ग्लोबल आईपीओ बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळते आहे. परंतु या कारणांचा भारतीय आयपीओ बाजारात फार फरक पडलेला दिसत नाही. उलट भारतीय बाजार मजबूत स्थितीत दिसतो आहे.


पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या प्राइमरी बाजारात 2022 च्या पहिल्या 5 महिन्यांत आत्तापर्यंत 16 कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून आत्तापर्यंत 40 हजार 942 कोटी रुपये जमा केले आहेत. chittorgarh.com या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार यावर्षी जमा झालेली रक्कम गेलीवर्षीच्या रकमेपेक्षा 41 टक्के अधिक आहे. 2021 मध्ये पहिल्या 5 महिन्यात 19 कंपन्यांनी आईपीओच्या माध्यमातून 29 हजार 038 कोटी रक्कम जमा केली होती.


यावर्षी एकट्या एलआयसीच्या आयपीओने 21 हजार कोटी रुपये जमा केले आहेत. 2022 या वर्षाचा विचार केला तर उर्वरित कंपन्यांचे आयपीओ आणि एकट्या एलआयसीने जमलेली रक्कम जवळपास 50 टक्के आहे.पण जर विचार केला तर एलआयसीचा आयपीओ हा सर्वात जास्त रक्कम देऊन गेला, पण दलाल स्ट्रीटवर आत्तापर्यंत बाकीच्या आयपीओंनी जमा केलेली रक्कम आत्तापर्यंतच्या रकमेपेक्षा 31 टक्के कमी आहे. परंतु जागतिक आयपीओच्या बाजारात आलेल्या पडझडीपेक्षा कमी आहे असा दावा केला जातो आहे.


युरोप आणि अमेरिकेच्या आयपीओ बाजारात सगळ्यात जास्त पडझड झाली. युरोप आणि अमेरिकेचा आयपीओ बाजार जवळपास 90 टक्के पडला आहे असं आकडेवारी सांगते. हे आकडे एका आर्थिक अहवालातून समोर आले आहेत. जागतिक बाजारावर नजर टाकायची झाल्यास 2022 या वर्षात गेल्या 5 महिन्यात आयपीओचं मूल्य ७१ टक्के पडलं आहे. 2021 साली सुरुवातीच्या पाच महिन्यांमध्ये 283 अरब डॉलर आयपीओची रक्कम होती. संपूर्ण वर्षभरात 1 हजार 237 अरब डॉलर गुंतवणूक होत असलेला बाजारात यावर्षी केवल 596 इतकी कमी रक्कम जमा झाली आहे.