Suzuki Intruder 150 Production Ends In India: Suzuki Motorcycle India ने भारतात Intruder 150 बाईकचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला घेतला आहे. भारतीय बाजारपेठेतील ही कंपनीची एकमेव क्रूझर बाईक होती. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीने आपल्या वेबसाइटवरून या बाईकची माहिती काढून टाकली आहे आणि बुकिंग देखील थांबवली आहे. असं असलं तरी कंपनीने अद्याप Intruder 150  बंद करण्याबद्दल अधिकृत अधिसूचना जारी केलेली नाही.


यामुळे कंपनीने बंद केलं उत्पादन 


मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपासून Suzuki Intruder 150 ची विक्री कमी होत असल्याने कंपनीने ही बाईक बंद करण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे. Suzuki Intruder 150 बाईक 2017 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. त्यानंतर 2020 मध्ये BS-VI इंजिनसह ही बाईक पुन्हा सादर करण्यात आली. सुझुकीच्या इतर बाईक्सप्रमाणे, Intruder 150 ही भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरली नसून लॉन्च झाल्यापासून तिची विक्री फारशी विशेष झालेली नाही. बंद होण्यापूर्वी या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.20 लाख रुपये होती. Suzuki Intruder 150 ला बाजारात बजाज अॅव्हेंजर 160 कडून मोठी स्पर्धा मिळत होती. विक्रीच्या बाबतीत, बजाज अॅव्हेंजर सुरुवातीपासूनच Suzuki Intruder 150 पेक्षा खूप पुढे आहे. 


सुझुकी मोटारसायकल भारतातील आपल्या नवीन मॉडेल्सवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या वर्षी कंपनीने नवीन Hayabusa भारतीय बाजारात लॉन्च केली होती, तर या वर्षी एप्रिलमध्ये V-Strom SX 250 बाईक कंपनीची मोठी लॉन्चिंग होती. कंपनी या दोन्ही बाईक्सची विक्री आणि उपकरणे पुरवण्यावर अधिक भर देत आहे.


सुझुकी मोटरसायकलने मे महिन्यात 71,526 बाईक्स आणि स्कूटरची विक्री नोंदवली आहे. कंपनीने विक्रीत 0.6 टक्क्यांची किरकोळ घट नोंदवली आहे. एप्रिल 2022 मध्ये सुझुकी मोटरसायकलने 71,987 मोटारसायकल विकल्या होत्या. मे महिन्यात विकल्या गेलेल्या 71,526 युनिट्सपैकी कंपनीने देशांतर्गत बाजारात 60,518 युनिट्सची विक्री केली. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत महिना -दर-महिना (MoM) 11.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये Suzuki V-Strom SX 250 लाँच केल्यामुळे विक्रीत वाढ झाली आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI