GST Collection: नोव्हेंबर महिन्यात जीएसटी संकलनात (GST collection) मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपये झाले आहे. जे मागील वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 15 टक्क्यांनी वाढले आहे. मात्र, ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये झालेल्या जीएसटी संकलनात घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन 1.72 लाख कोटी रुपये होते.


वित्त मंत्रालयाने जीएसटी संकलनाचा डेटा जारी केला आहे. त्यानुसार नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1,67,929 कोटी रुपये आहे. जे ऑक्टोबरच्या आधीच्या महिन्यात 1,72,003 कोटी रुपये होते. आकडेवारीनुसार, CGST संकलन 30420 कोटी रुपये, SGST 38226 कोटी रुपये, IGST 87,009 कोटी रुपये होता. गेल्या महिन्यात IGST संकलन 91,315 कोटी रुपये होते. तर उपकराचे संकलन 12274 कोटी रुपये झाले असून, त्यातील 1036 कोटी रुपये आयात मालावर जमा झाले आहेत.


जीएसटी संकलनात 15 टक्क्यांची वाढ


वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत नोव्हेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलनात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात ही सहावी वेळ आहे जेव्हा GST संकलन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण GST संकलन 11.9 टक्क्यांनी वाढून 13,32,440 कोटी रुपये झाले आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत एकूण GST संकलन 11,90,920 कोटी रुपये होते. या आठ महिन्यांत दरमहा सरासरी 1.66 लाख कोटी रुपये GST संकलन झाले आहे. जे 2022-23 च्या याच कालावधीत सरासरी 1.49 लाख कोटी रुपये होते. या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन 1,87,035 कोटी रुपये होते, जे विक्रमी उच्चांक आहे. यानंतर मे ते सप्टेंबर दरम्यान थोडी घसरण झाली.


ऑक्टोबर 2023 मध्ये 1.72 लाख कोटी रुपये कर संकलन


ऑक्टोबर 2023 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1.72 लाख कोटी रुपये झाले आहे. 1 जुलै 2017 रोजी GST लागू झाल्यानंतर ऑक्टोबर 2023 मधील GST संकलनाची ही दुसरी सर्वोच्च पातळी आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत GST संकलनात 13 टक्के वाढ झाली आहे. 1 जुलै 2017 रोजी GST लागू झाल्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये झालेले GST संकलन ही दुसरी सर्वोच्च पातळी आहे. अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर 2023 साठी जीएसटी संकलन डेटा जारी केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


GST Collection : सणासुदीच्या काळात सरकारच्या तिजोरीत भर,  GST संकलनात मोठी वाढ