Nokia Layoff :  दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी नोकियामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरी कपात होण्याची शक्यता आहे. जवळपास 14,000 कर्मचार्‍यांच्या कंपनी नारळ देण्याच्या तयारीत आहे. नोकिया कंपनीने त्यांच्या खर्चात कपात करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून कर्मचारी कमी करण्याची योजना आखली आहे.


दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज नोकियाबद्दल मोठी बातमी आली आहे, यानंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नोकियाला छाटणीचा सामना करावा लागणार आहे. या अंतर्गत कंपनी 14000 लोकांना कामावरुन काढून टाकणार आहे. नोकियाने तिसर्‍या तिमाहीतील निकालांमध्ये विक्री 20 टक्क्यांनी घसरल्यानंतर आपल्या नवीन खर्चात कपात करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या 5G उपकरणांच्या विक्रीच्या संथ गतीमुळे विक्रीत ही घट दिसून आली आहे.


खर्चात बचत करण्यासाठी नोकियाने घेतला हा निर्णय 


इकॉनॉमिक टाईम्समधील एका बातमीनुसार, फिनिश टेलिकम्युनिकेशन्स इक्विपमेंट ग्रुपच्या नोकियाचा अंदाज आहे की 2026 पर्यंत ते 800 दशलक्ष ते 1.2 अब्ज युरोच्या खर्चात बचत करू शकते. या वेळेपर्यंत कंपनीने सुमारे 14 टक्के ऑपरेटिंग मार्जिन गाठणे अपेक्षित आहे. या अंतर्गत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 86 हजारावरुन 72 ते 77 हजारपर्यंत कमी करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.


नोकियाची या तिमाहीत काय स्थिती ?


नोकियाने यावेळी अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केली आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा 467 दशलक्ष रुपये होता. त्याची समायोजित कमाई देखील प्रति शेअर 5 सेंटपर्यंत घसरली आहे. तर विश्लेषकांनी अंदाजे 7 सेंट्सची कमाई केली आहे. याशिवाय, कंपनीने दुसऱ्या तिमाहीतील विक्री मार्गदर्शन 24.6 अब्ज युरोवरुन 23.2 अब्ज डॉलर्सपर्यंत कमी केले आहे. त्याचवेळी, कंपनीने ऑपरेटिंग मार्जिन 11.5 टक्के ते 13 टक्के दरम्यान असण्याचा अंदाज वर्तवला होता. तर आधी तो 14 टक्के असा अंदाज होता.


5G उपकरण निर्मात्यांसाठी आव्हानात्मक वातावरण


यूएस आणि युरोपियन युनियनने भांडवली खर्च कमी करण्याच्या आणि त्यांची यादी कमी करण्याच्या निर्णयामुळे, 5G उपकरणे उत्पादक महसूल आणि नफ्याच्या आघाडीवर संघर्ष करत आहेत. नोकियाने नुकताच आपला नवा लोगो प्रदर्शित केला असून आज बार्सिलोना येथे होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या अगोदरच आपला नवीन लोगो उघड केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Airtel 5G : एअरटेलची 5G सेवा ऑगस्टमध्ये सुरु होणार; एरिक्सन, नोकिया, सॅमसंगसोबत झाला करार