Niva Bupa Health Insurance IPO: निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (याआधी मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी) या कंपनीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. या आयपीओत 7 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी होती. सोमवारी गुंतवणुकीच्या अंतिम दिवशी हा हा आयपीओ 1.90 पटीने सबस्क्राईब झाला. एनएसईवरील आखडेवारीनुसार निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून 17,28,57,143 शेअर्स विक्रीसाठी काढले होते. पण गुंतवणूकदारांकडून एकूण 31,13,62,800 शेअर्सच्या विक्रीसाठी बोली प्राप्त झाल्या. या आयपीओचा किंमत पट्टा 70-74 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला होता. सध्या या कंपनीचा जीएमपी हा शून्यावर आहे. काही दिवसांपूर्वी हाच जीएमपी तीन रुपयांवर होता. दरम्यान, जीएमपीमध्ये फारसा चांगला प्रतिसाद न मिळताही हा आयपीओ ओव्हरसबस्क्राईब झाला आहे.
कोणत्या क्षेत्रात किती सबस्क्रीप्शन मिळाले
किरकोळ गुंतवणूकदारांच्या (आरआयआय) विभागात हा आयपीओ क्षमतेच्या 2.73 पटीने सबस्क्राईब झाला आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार अर्थात क्यूआयबी या श्रेणीत हा आयपीओ निर्धारित प्रमाणाच्या 2.06 पटीने सबस्क्राईब झाला.गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीत हा आयपीओ 68 टक्क्यांनी सबस्क्राईब जाला.
निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीचा आयपीओ 2,200 कोटी रुपयांचा होता. या आयपीओच्या माध्यमातून एकूण 800 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्श विक्री करण्यात येणार आहेत. तर ओएफएसच्या माध्यमातून एकूण 1400 कोटी रुपयांचे शेअर्स विकण्यात येणार आहेत. याआधी निवा बुपा ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 3000 कोटी रुपये उभे करणार होती. ही कंपनी आपयीओनंतर बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध होणार आहे.
कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध कधी होणार?
वर उल्लेख केल्याप्रमाणे या आयपीओत 7 ते 11 नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी होती. 12 नोव्हेंबर रोजी या आयपीओचे शेअर्स अलॉट होणार आहेत. तर 13 नोव्हेंबर रोजी अयशस्वी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. यशस्वी गुंतवणूकदारांच्या डी-मॅट खात्यात 13 नोव्हेंबर रोजीच शेअर्स ट्रान्सफर केले जातील. तर येत्या 14 नोव्हेंबर रोजी ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार आहे.
हेही वाचा :
Rupee Record Low: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची विक्रमी घसरण, आता 1 डॉलर 84.23 रुपयांना