Waaree Energies : वारी एनर्जीजच्या शेअरचा 11 दिवसात धमाका, गुंतवणूकदारांना 130 टक्क्यांहून अधिक रिटर्न, शेअर पोहोचला 3500 रुपयांवर
सोलर कंपनी वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न मिळाला आहे. वारी एनर्जीज शेअर आज 3570 रुपयांपर्यंत पोहोचला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवारी एनर्जीजचा आयपीओ भारतीय शेअर बाजारात 28 नोव्हेंबरला लिस्ट झाला आहे. आयपीओच्या एका शेअरचं मूल्य कमाल 1503 रुपये निश्चित करण्यात आलं होतं. आयपीओ लिस्ट होताना तो 2500 रुपयांना झाला.
आयपीओच्या लिस्टींगवेळी गुंतवणूकदारांना 66 टक्के रिटर्न मिळाला होता. आज वारी एनर्जीजच्या शेअरची किंमत 3570 रुपयांवर पोहोचला होता. म्हणजेच गुंतवणूकदारांना आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला तेव्हा 1503 रुपयांना एक शेअर मिळाला होता. 1503 रुपयांच्या तुलनेत गुंतवणूकदारांना दुप्पट पैसे मिळाले आहेत. साधारणपणे 130 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. वारी एनर्जीजच्या कंपनीची मार्केट कॅप 90 हजार कोटींच्या पुढे गेली आहे. वारी एनर्जीजचा आयपीओ 79.44 पट सबस्क्राइब झाला होता.
वारी एनर्जीजच्या शेअरची किंमत आजच्या दिवशी मार्केट बंद झालं तेव्हा 3437.40 रुपये इतकी होती. म्हणजेच आजच्या दिवशी वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये 449.70 रुपयांची वाढ झाली.
वारी एनर्जीजमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गेल्या 11 दिवसात दमदार परतावा मिळाला आहे. एकीकडे शेअर बाजारात घसरणीचं सत्र असताना वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये जोरदार वाढ दिसत आहे.