Nithin Kamath on Share Market scam : शेअर बाजारात (Share Market) नवा घोटाळा (New scam) आल्याची माहिती झिरोधाचे सह संस्थापक नितीन कामथ यांनी दिली आहे. खोट्या ट्रेडिंग अॅप्सच्या (Fake Tranding Apps) माध्यमातून हा स्कॅम होत आहे. हे अॅप्स आघाडीच्या ब्रोकर कंपन्याची नक्कल करत असल्याचे कामथ म्हणाले. याबाबत कामथ यांनी गुंतवणूकदारांना सावध केलं आहे.  


खोट्या ट्रेडिंग अॅप्सच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये मोठा घोटाळा होत असल्याची माहिती नितीन कामथ यांनी दिलीय. लोकांना लवकर श्रीमंत होण्याचा मार्ग सांगतात आणि त्यातून त्यांची फसवणूक करतात असे कामथ म्हणाले. कामथ यांनी याबबातची माहिती ट्वीटरवर दिली आहे. यामध्ये त्यांनी बनावट अॅप्सचा फुगा फुटला आहे. हे अॅप्स गुंतवणुकदार आणि शेअर बाजारासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे कामथ म्हणाले. 


नेमकी कशी होते फसवणूक?


दरम्यान, नितीन कामथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोटी ट्रेडिंग अॅप्स तुम्हाला व्यापार करण्यास प्रवृत्त करतात. कमी काळात जास्त नफा देण्याचे अमिष दाखवतात, यामध्यमातून फसवणूक होते. नितीन कामथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला बनावट अॅप्स गुंतवणूकदारांना त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करुन घेतात. त्यानंतर मोठ्या ब्रोकर्ससारखे दिसणारे बनावट ट्रेडिंग अॅप्स मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगतात. यानंतर गुंतवणूकदार या अॅप्सच्या माध्यमातून व्यापार करतो. सुरुवातीच्या काही काळात तो या अॅप्सच्या माध्यमातून पैसे देखील कमावतो. यानंतर गुंतवणूकदाराला पैसे मिळत असल्याची खात्री पटते. या माध्यमातून आपण भरपूर पैसे मिळवू शकतो असा समज होतो. काही काळानंतर निधी हस्तांतरीत करण्यास सांगितले जाते. गुंतवणूकदाराला प्रथम फी, कर इत्यादी भरण्यास सांगितलं जातं आणि काळी वेळानं तो संपूर्ण ग्रुप गायब होतो. अशा प्रकारे शेअर मार्केट घोटाळा होत असल्याचे कामथ म्हणाले.


सुशिक्षीत लोकही घोटाळ्यांना सहज बळी पडतात


दरम्यान नितीन कामथ (Nitin Kamath) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशिक्षीत लोकही घोटाळ्यांना सहज बळी पडतात. त्यामुळं कामथ यांनी गुंतवणूकदारांना सावध केलं आहे. लवकर पैसे कमवण्याचा सल्ला जर तुम्हाला कोणी दिला, तर त्यापासून तुम्ही सावध राहा असे कामथ म्हणाले. हे अॅप्स लोकांना लवकर श्रीमंत होण्याचा मार्ग सांगतात आणि त्यातून त्यांची फसवणूक होत असल्याचे कामथ म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


1 लाखाचे झाले 76 लाख, चार वर्षांत तब्बल 7530 टक्क्यांनी रिटर्न्स; 'ही' कंपनी तुम्हाला करू शकते श्रीमंत?