New Year Stock Market : नवीन वर्ष सुरु होण्याच अवघे दोन दिवस बाकी आहेत. या नवीन वर्षात काही कंपन्यांचे शेअर्स मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार आहेत. गुंतवणुकदारांना याचा मोठा फायदा होणार आहे. वर्ष 2024 मध्ये भारतीय शेअर बाजाराची कामगिरी सकारात्मक राहिली आहे. आता नवीन वर्ष 2025 सुरू होणार आहे. भारतातील आणि जागतिक स्तरावरील बाजारपेठांवर याचा परिणाम करणारे अनेक ट्रेंड आहेत. दरम्यान, ब्रोकरेज फर्म प्रोग्रेसिव्ह शेअर ब्रोकर्सने टॉप 5 समभागांची यादी जाहीर केली आहेत, जे नवीन वर्षात गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरु शकतात.
आयटीडी सिमेंटेशन इंडियाचा
आयटीडी सिमेंटेशन इंडियाच्या स्टॉकमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेजने 820 रुपये किंमत निश्चित केली आहे. सध्या या शेअरची किंमत ही 532 रुपये आहे. या शेअर्सच्या किंमतीत आणखी 54 टक्क्यांची मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
लुपिन
नवीन वर्षात औषध कंपनी लुपिनच्या स्टॉकमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेजने 2,800 रुपयांची किंमतीसह हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या शेअरची किंमत 2,228 रुपये आहे. या स्टॉकवर 26 टक्के अधिकचा परतावा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे,.
शीला फोम
गाद्यांची निर्मिती करणाऱ्या शीला फोमच्या स्टॉकमध्ये देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हा स्टॉक 1500 रुपयांच्या किंमतीसह खरेदी करण्याच सल्ला दिला आहे. मात्र, सध्या या स्टॉक्सची किंमत 987 रुपये आहे. या किंमतीत शेअरमध्ये आणखी 52 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स
श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचे शेअर्स देखील खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रति शेअर 551 रुपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे. सध्याची किंमत 327 रुपये आहे. या किंमतीवर स्टॉक 69 टक्क्यांचा परतावा मिळण्याची शक्यता आहे.
वेलस्पन एंटरप्रायझेस
वेलस्पन एंटरप्रायझेसचा स्टॉक 784 रुपयांच्या किंमतीला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याची किंमत 600 रुपये आहे. या किमतीत शेअरमध्ये आणखी 31 टक्के वाढ होऊ शकते. दरम्यान, ज्या नागरिकांना शेअर्सची खरेदी करायची आहे, त्यांनी लवकरात लवकर शेअर्स खरेदी करणे गरजेचे आहे. कारण सध्या शेअर मार्टेमध्ये चढ उतार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सातत्यानं चध उतारा पाहायला मिळत आहे.