New Job : प्रत्येकालाच वाटते की आपल्या आवडीचं काम मिळालं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. कारण सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी (Unemployment) असल्याची चित्र दिसत आहे. त्यामुळं आहे त्या ठिकाणी काम करण्यातच अनेकांना समाधान मानावं लागत आहे. दरम्यान, देशातील प्रत्येक 100 पैकी 88 लोक नवीन नोकरीच्या शोधात (New Job) आहेत. एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.


अहवालात दिलेल्या माहितीनुसार लोक त्यांच्या सध्याच्या नोकरीवर खूश नाहीत. त्यांचा खर्च भागवण्यासाठी त्यांना पुरेसा पगार मिळत नसल्याचे म्हटलं आहे. याशिवाय अहवालात नोकऱ्यांबाबत अनेक खुलासे करण्यात आलेत, जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर माहिती.  नोकरीसंदर्भातील एका अहवालात धक्कादायक खुलासा  करण्यात आला आहे. अहवालानुसार, प्रत्येक 100 पैकी 88 लोक त्यांच्या नोकरीवर खूश नाहीत आणि ते नवीन नोकरीच्या शोधात आहेत. या 88 टक्के लोकांमध्ये 18 ते 24 वयोगटातील लोकांचा समावेश आहे, ज्यांना नोकरी बदलायची आहे. 


LinkedIn च्या अहवालातून माहिती समोर


ऑनलाइन जॉब सर्चिंग पोर्टल LinkedIn ने 2023 साठी आपला अहवाल जारी केला आहे. ज्यामध्ये असे उघड झाले आहे की प्रत्येक 100 पैकी 88 लोक त्यांच्या नोकरीवर खूश नाहीत.  नवीन वर्षात त्यांची नोकरी बदलू इच्छित आहेत. त्याच वेळी, 2021 च्या तुलनेत, गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये भारतात नोकरभरतीची पातळी 23 टक्के कमी झाली आहे.


 तरुणवर्गाचा नोकरी बदलण्याचा अधिक विचार


30 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 दरम्यान 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 2 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांवर केलेल्या संशोधनातून असे समोर आले आहे की, 18 ते 24 वर्षे वयोगटातील सुमारे 88 टक्के तरुणांना नोकरी बदलायची आहे. तर 45 ते 54 वयोगटातील 64 टक्के लोक नोकरी बदलू इच्छितात. याचाच अर्थ वृद्धांपेक्षा तरुणवर्ग यावर्षी नोकरी बदलण्याचा अधिक विचार करत आहे.


नोकऱ्या बदलण्याचे कारण काय? 


सर्वेक्षण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी जवळपास तीन चतुर्थांश कर्मचाऱ्यांनी नोकरी बदलण्यामागे अतिशय आश्चर्यकारक कारण दिले आहे. वाढता खर्च आणि कमी पगार यामुळं कर्मचाऱ्यांना नवीन नोकऱ्या शोधाव्या लागत आहेत. सर्वेक्षणात जवळपास 35 टक्के लोक आहेत, जे जास्त पैसे हवे आहेत. तर 33 टक्के लोक असे आहेत की, ज्यांना अशा कंपनीत काम करायचे आहे जिथे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन आहे. सुमारे 32 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास आहे. त्यांना वाटते की त्यांना चांगल्या पगारासह चांगली नोकरी मिळू शकते.


महत्त्वाच्या बातम्या:


22 जानेवारीनंतर अयोध्येत लाखो पर्यटक येणार, 20 हजार लोकांना मिळणार काम