New Business : तुम्हाला जर तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल आणि कमी खर्चात बंपर नफा मिळवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला एका बिझनेसबद्दल माहिती सांगणार आहोत. हा व्यवसाय तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तावर सुरु करू शकता. बबल पॅकिंग पेपर्सच्या व्यवसायाबद्दल माहिती पाहणार आहोत. 


दैनंदिन वापरात वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या पॅकेजिंगची मागणी वाढली आहे. अन्न, पेये आणि FMCG उत्पादनांच्या वितरणासाठी विशेष पॅकेजिंग आवश्यक आहे. नाशवंत वस्तूंच्या वितरणासाठी विशिष्ट प्रकारचे पॅकेजिंग आवश्यक असते. हे बबल शीटमध्ये पॅक केलेले असते. अशा परिस्थितीत, दिवाळीच्या मुहूर्तावर, आपण बबल पॅकिंग पेपर व्यवसायाद्वारे मोठा नफा कमवू शकतो. 


हा व्यवसाय सुरु करण्यासाठी किती खर्च?


खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) बबल पॅकिंग पेपर मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायावर एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, बबल पॅकिंग पेपरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 15.05 लाख रुपये खर्च येईल. यामध्ये 800 चौरस फुटांचे वर्कशेड बांधण्यासाठी 1.60 लाख रुपये आणि उपकरणासाठी 6.45 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी एकूण 8.05 लाख रुपये खर्च येणार आहे. याशिवाय खेळत्या भांडवलासाठी 7 लाख रुपये लागतील. एकूण प्रकल्प खर्च 15.05 लाख रुपये असेल म्हणजेच बबल पॅकिंग पेपरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि चालवण्यासाठी 15 लाख रुपये लागतील.


व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार करणार मदत 


प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सरकार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करते. AAP प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत, सरकार त्यांचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते. या व्यवसायातून तुम्हाला लाखो रुपयांचा नफा मिळू शकतो.


केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचे उद्देश


केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेचे (पीएमएमवाय) दोन उद्देश्य आहेत. पहिले स्वंयरोजगारसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे आणि दुसरे छोट्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणे. जर तुम्ही आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी उच्छुक असाल आणि तुम्हाला भांडवलाची समस्या सतावत असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या पीएमएमवाय योजनेच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार करू शकता. सरकारचा असा विचार आहे की, सहज कर्ज मिळाल्यानं लोक स्वंयरोजगार करण्यासाठी प्रेरित होतील. यामुळं मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री मुद्रा योजना (पीएमएमवाय) सुरु होण्यापूर्वी छोट्या उद्योगासाठी बँकेतून लोन घेण्यासाठी अनेक औपचारिकता पूर्ण कराव्या लागत होत्या. कर्जसाठी गॅरंटीही द्यावी लागत होती. या कारणामुळे अनेक लोक आपला स्वत:चा व्यवसाय तर सुरु करण्यास इच्छुक होते मात्र बँकेतून कर्ज घेण्यासाठी कचरत होते.


महत्त्वाच्या बातम्या:


'या' कंपनीच्या मालकाचा दाणशूरपणा, कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून दिल्या कार