Networth of Top 5 Richest Men : एका नवीन अहवालानुसार, जगातील 5 सर्वात श्रीमंत व्यक्तींनी (Top-5 Richest People) प्रत्येक दिवसाला एक दशलक्ष डॉलर्स (One Million Dollor) खर्च केले तरी, त्यांचे पैसे संपायला 476 वर्ष लागतील. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींनी दिवसाला 1 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 8.3 कोटी रुपये खर्च केले तरी त्यांची सर्व संपत्ती संपायला 476 वर्ष लागतील. ऑक्सफॅम रिपोर्ट (Oxfam Report) नुसार, ही बाब समोर आली आहे. ऑक्सफॅमने फोर्ब्सच्या रिअलटाईम लिस्टनुसार जगातील पाच अब्जाधीशांबाबत नोव्हेंबर 2023 मध्ये एक अहवाल जारी केला आहे. यानुसार, जगातील टॉप-5 अब्जाधीशांनी दररोज एक मिलियन डॉलर खर्च केले तरी त्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या बसून खाऊ शकतात, एवढी त्यांची संपत्ती आहे. 


जगातील 'या' 5 व्यक्तींकडे कुबेराचा खजिना!


जगातील टॉप पाच श्रीमंत व्यक्तींवर जणू कुबेराचा खजिना आहे. जगातील या टॉप-5 अब्जाधीशांमध्ये एक्स मीडिया म्हणजे आधीचं ट्विटर आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक एलॉन मस्क Elon Musk), बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault), जेफ बेझोस (Jeff Bezos), लॅरी एलिसन (Larry Ellison) आणि वॉरेन बफेट (Warren Buffett) यांचा समावेश आहे. यासर्वांच्या संपत्तीचं विश्लेषण करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.


पाच अब्ज लोक झाले गरीब


युके आधारित संस्था Oxfam च्या अहवालानुसार, जगातील पाच श्रीमंत लोकांची संपत्ती 2020 पासून 405 अब्ज डॉलर वरून 869 अब्ज  डॉलर झाली आहे. या अब्जाधीशांची संपत्ती दर तासाला, दर मिनिटाला  वाढत आहे. याउलट दर तासाला 14 दशलक्ष डॉलर दराने जवळपास पाच अब्ज लोक गरीब झाले आहेत. Oxfam च्या अहवालानुसार, जर सध्याचा ट्रेंड असाच चालू राहिला तर जगाला दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत पहिला ट्रिलियनियर मिळेल, पण गरिबी आणखी 229 वर्षे संपणार नाही.


महागाई दरापेक्षा तीन पट वेगाने संपत्तीत वाढ


ऑक्सफॅम इंटरनॅशनलचे अंतरिम कार्यकारी संचालक अमिताभ बेहार यांनी सांगितलं की, "हा फरक अचानक झालेला नाही. अब्जाधीश वर्ग यावर लक्ष ठेवत आहे की, त्यांना इतर सर्व खर्चाच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळेल." 2020 च्या तुलनेने आता अब्जाधीश 3.3 ट्रिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 34 टक्क्यांनी अधिक श्रीमंत आहेत. त्यांची संपत्ती महागाई दरापेक्षा तीन पट वेगाने वाढत आहे.


पुरुषांकडे महिलांपेक्षा जास्त संपत्ती


ऑक्सफएमच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर पुरुषांकडे महिलांपेक्षा 105 ट्रिलियन डॉलर जास्त संपत्ती आहे. हा फरक अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या आकारापेक्षा चार पट जास्त आहे. सर्वात मोठ्या फॉर्च्युन 100 फर्मच्या सीईओने एका वर्षात जितके पैसे कमावले आहेत तितके पैसे कमवण्यासाठी आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील एका महिला कर्मचाऱ्याला 1,200 वर्षे काम करावं लागेल.


या अहवालानुसार, जगभरातील लोक दीर्घकाळ काम करत आहेत, पण बहुतेकदा अनिश्चित आणि असुरक्षित नोकऱ्यांमध्ये गरिबाच्या वेतनासाठी म्हणजे जवळपास 800 दशलक्ष कामगारांचे वेतन आणि महागाईचा वेग एकसारखा राखता आलेला नाही. गेल्या दोन वर्षांत त्यांना 1.5 ट्रिलियन डॉलरचं नुकसान झालं आहे, जे प्रत्येक कामगाराच्या मासिक वेतनाएवढं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये एकही भारतीय नाही, 'ही' आहेत टॉप-5 श्रीमंत कुटुंब