मुंबई : मोठा गाजावाजा करत सुरु करण्यात आलेलं सूरत डायमंड बोर्स (Surat Diamond Bourse)  संकटात सापडल्याचं चित्र आहे. कारण या बोर्ससाठी पुढाकार घेणारे प्रख्यात हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी हेच आपला व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवणार असल्याचं कळतंय. सर्वात मोठं कारण म्हणजे मुंबईतील (Mumbai)  अन्य हिरे व्यापाऱ्यांकडून त्यांना सहकार्य लाभत नाही. हे व्यापारी आपलं बस्तान सूरतला हलवण्यास तयार नाहीत. आणखी एक कारण असं की हा बोर्स सूरमधील हिरे केंद्रपासून दूर असल्याने कर्मचारी आणि मजूर देखील काम करण्यास तयार नाहीत.


सूरत डायमंड बोर्सचा हा  मोठा धक्क आहे.   किरण जेम्स ही कंपनी मुंबईतून देखील व्यवसाय सुरुच ठेवणार  आहे. दोन दिवसांपासून सूरतवरुन व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवण्यास सुरुवात झाली आहे.  सूरत डायमंड बोर्समधील किरण जेम्स ही सर्वात मोठी कंपनी आहे.  मागच्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 17 डिसेंबर रोजी सूरत डायमंड बोर्सचं उद्घाटन करण्यात आले आहे.   सूरतमध्ये शिफ्ट झाल्यानंतर किरण जेम्सच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तसेच उत्पन्नात झालेली घट हे देखील मुख्य कारण आहे.


सूरत डायमंड बोर्समध्ये जवळपास 150 कंपन्या कार्यरत 


सूरत डायमंड बोर्स पूर्णपणे सक्रिय नसण्याआधीच किरण जेम्सनं आपला व्यवसाय सूरतला हलवला होता.  त्याचाच अधिक फटका बसल्याची शक्यता वर्तवण्यात आहे. तसेच कर्मचाऱ्यांकडून देखील पुन्हा मुंबईला परतण्याची इच्छा आणि लॉजिस्टिक आव्हानांमुळे व्यवसायाला मोठा फटका  बसला आहे. सूरत डायमंड बोर्समध्ये जवळपास 150 कंपन्या कार्यरत आहेत. यातील किरण जेम्स ही सर्वात मोठी कंपनी आहे. 


 सूरत डायमंड बोर्सच्या निर्मितीत  वल्लभभाई लखानी यांचा मोठा वाटा


सूरत डायमंड बोर्सच्या निर्मितीनंतर वल्लभभाई लखानी यांच्याकडून आपला संपूर्ण व्यवसाय सूरतला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  मात्र आलेल्या अडचणींनंतर व्यवसाय दोन्हीकडे सुरु ठेवणार असल्याची माहिती  मिळत आहे. सूरत डायमंड बोर्स अद्यापही पूर्णपणे सक्रिय नाही, मे 2024 पर्यंत अनेक कंपन्यांची दुकानं इथं थाटण्याचा विचार आहे.  सूरत डायमंड बोर्सच्या निर्मितीत किरण जेम्सचे सर्वेसर्वा वल्लभभाई लखानी यांचा मोठा वाटा आहे.


सूरत डायमंड बोर्सवरून राज्यात राजकारण


 मुंबईतील काही व्यापारी सुरतला आपला व्यवसाय नेणार असल्याने यावर राज्यात चांगलच राजकारण रंगले होते. महाराष्ट्रातून  व्यवसाय बाहेर जात असल्याने विरोधी पक्षांनी राज्य सरकार टिकेची झोड उठवली होती.  हिरे आणि त्यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या व्यापारासाठी हे जगातील सर्वात मोठं आणि आधुनिक केंद्र आहे. कच्चे आणि पॉलिश्ड हिरे तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठी हे जागतिक केंद्र असेल. डायमंड बोर्समध्ये आयात आणि निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस, रिटेल ज्वेलरी व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल, आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सिक्योर वॉल्टची सुविधा आहेत.  


हे ही वाचा :


सरकारच्या पाठिंब्याशिवाय हिरे व्यापाऱ्यांचं मोठं पाऊल, गुजरातमध्ये उभारलं जगातील सर्वात मोठं हिरे व्यवसाय केंद्र