मुंबई : ई-कॉमर्स क्षेत्रात रोज नवनवे बदल होत आहेत. ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर केलेले एखादे सामान ग्राहकापर्यंत कमीत कमी वेळात कसे पोहोचेल यासाठी ई-कॉमर्स कंपन्या वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. झेप्टो, ब्लिकइट यासारख्या कंपन्या तर अवघ्या काही निनिटांत सामान ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा यंत्रणा प्रत्यक्ष राबवत आहेत. असे असतानाच आता मिंत्रा या ई-कॉमर्स कंपनीनेही या स्पर्धेत उडी घेतली आहे. या कंपनीने आम्ही अवघ्या 30 मनिटांत तुम्हाला सामान आणून देऊ, असं आश्वासित केलंय. त्यासाठी या कंपनीने खास प्लॅनिंगही केलंय. 


30 मिनिटांत सामान पोहोचवण्याचे आश्वासन


मिंत्रा ही ई-कॉमर्स कंपनी फॅशन आणि लाईफस्टाईलशी निगडीत सामान पुरवण्याचे काम करते. या कंपनीने नुकतेच M-Now नावाची क्विक कॉमर्स सेवा चालू केली आहे. गुरुवारपासून ही सेवा चालू करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून मिंत्रा ही कंपनी अवघ्या 30 मिनिटांत सामान डिलिव्हर करणार आहे. ही सेवा सुरू करून एका अर्थाने मिंत्रा या कंपनीने झेप्टो आणि ब्लिंकइट या कंपन्यांशी थेट स्पर्धा चालू केली आहे. झेप्टो आमि ब्लिंकइट या दोन कंपन्याचा क्विक डिलिव्हरी सेगमेंटमध्ये चांगलाच विस्तार झालेला आहे. असे असताना मिंत्रापुढे या क्षेत्रात लोकांच्या विश्वासास पात्र ठरण्याचे मोठे आव्हान असेल. 


सध्या सेवा फक्त बंगळुरू शहरापुरती मर्यादित


मिंत्राच्या सीईओ नंदिता सिन्हा यांनी या नव्या सेवेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. सध्या एम-नाऊ ही सुविधा फक्त बंगळुरू शहरात राबवली जात आहे. लवकरच या सुविधेचा विस्तार देशभरातील महानगरांत तसेच इर शहरांत केला जाईल. एम-नाऊ या सुविधेच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना निवडीची संधी आणि सुविधा या दोन्ही बाबी देण्याचा प्रयत्न करत आहोत, असे सिन्हा यांनी सांगितले. 


अनेक ब्रँड्सची उत्पादनं पुरवली जाणार


मिंत्रा या ई-कॉमर्स कंपनीच्या एम-नाऊ या सुविधेअंतर्गत व्हेरो मोडा, मँगो, टॉमी हिलफिगर, लेवी, ओन्ली, ओलाप्लेक्स, डायसन, अरमानी एक्सचेंज, फॉसिल, कॅसो, मोकोबारा, हुडा ब्यूटी, मॅक, बॉबी ब्राउन आणि एस्टी लॉडर यासह इतर जागतिक ब्रँड्सची उत्पादनं ग्राहकांना मिळणार आहेत. सध्यातरी ही सुविधा फक्त बंगळुरूमध्ये आहे. लवकरच या सेवेचा विस्तार देशभरात केला जाणार आहे. 


मिंत्रांची दोन कंपन्यांशी स्पर्धा


zepto आणि Blinkit गेल्या बऱ्याच दिवसांपासून इन्टन्ट डिलिव्हरी या सेगमेंटमध्ये काम करत आहेत. या दोन्ही मंचावर ग्रॉसरी, फॅशन-ब्यूटी, फ्रूट्स तसेच इतरही प्रोडक्ट्स घरपोच पुरवले जातात. यासह बिग बास्केटदेखील अगदी 10 दहा मिनिटांत सामान पोहोचवण्याचं आश्वासन देते.


हेही वाचा :


RBI कडून सलग 11 व्यांदा रेपो रेट जैसे थे, जाणून घ्या वाहन खरेदी कर्ज, होम लोनचा हप्ता कमी होणार की महागणार?


डिसेंबर महिन्यात करून घ्या 'ही' चार महत्त्वाची कामं, अन्यथा खिशाला बसेल मोठी झळ!


CRR : सीआरआर म्हणजे काय? बँकिंग व्यवस्थेत 1.16 लाख कोटी रुपये कसे येणार?