December Deadlines : डिसेंबर महिना चालू होऊन आज सहा दिवस झाले आहेत. हा महिना संपताच आता नवे वर्ष चालू होईल. त्यामुळे या महिन्यात अर्थकारणाशी निगडीत तुम्हाल बरीच कामे लवकरात लवकर करून घ्यावी लागतील. तसे न केल्यास तुमच्या खिशाला चांगीलच झळ बसण्याची शक्यता आहे. ही कामे कोणकोणती आहेत, ही कामे करण्याची शेवटची तारीख काय आहे? हे जाणून घेऊ या...
प्राप्तिकर भरण्याची संधी
तुम्ही 2023—24 या आर्थिक वर्षाचा आयटीआर दाखल केलेला नसेल तर तो भरण्यासाठी तुमच्याकडे 31 डिसेंबरपर्यंत संधी आहे. यासह तुम्हाला 15 डिसेंबरपर्यंत अॅडव्हान्स टॅक्स भरता येईल. नियमानुसार 15 मार्चपर्यंत 100 टक्के अॅडव्हान्स कर देणे गरजेचे असते. 15 डिसेंबरपर्यंत 45 टक्के, 15 डिसेंबरपर्यंत 75 टक्के तर 15 मार्चपर्यंत 100 टक्के अॅडव्हान्स टॅक्स भरण्याची मुदत असते.
आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत
तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख आदी माहिती बदलायची असेल तर 14 डिसेंबरपर्यंत हा बदल मोफत करता येईल. माय आधार पोर्टलवर जाऊन तुम्हाला हे बदल करता येतील. मात्र 14 डिसेंबरनंतर तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन हे बदल करावे लागती. सोबतच 14 डिसेंबरनंतर तुम्हाला हे बदल करण्यासाठी पैसेदेखील द्यावे लागतील.
स्पेशल एफडी करण्याची मुदत
IDBI Bank उत्सव एफडी अंतर्गत 300, 375, 444 आणि 700 दिवसांत पूर्ण होणाऱ्या एफडीवर चांगले रिटर्न्स देत आहे. त्याशिवाय पंजाब अँड सिंध बँकही वेगवेगळ्या काळात मॅच्यूअर होणाऱ्या एफडीवर चांगले रिटर्न्स देत आहे. या सर्व योजनांत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे.
ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डच्या व्याजदरात बदल
ॲक्सिस बँक (Axis Bank) आपल्या क्रेडिट कार्डच्या नियम आणि अटीमंमध्ये येत्या 20 डिसेंबरपासून बदल करणार आहे. त्यासह एअरटेल ॲक्सिस बँक (Airtel Axis Bank Credit Card) क्रेडिट कार्डच्या व्याजातही 3.6 टक्क्यांवरून 3.75 टक्के प्रति महिना असा बदल होणार आहे. त्यामुळे या सर्व तारखा लक्षात ठेवूनच तुम्ही या महिन्याचे नियोजन करायला हवे. तसे न केल्यास तुम्हाल आर्थिक भुर्दंडाला समोरे जावे लागू शकते.
हेही वाचा :