मुंबई : म्हाडाने मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठीची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी 1 लाख 13 हजार जणांनी अर्ज केला होता. मात्र या अर्जदारांपैकी फक्त 2030 भाग्यवंतांना हे घर मिळाले आहे. उर्वरित अर्जदारांची निराशा झाली आहे. मात्र गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी घराचे स्वप्न बघणाऱ्यांना खुशखबर दिली आहे. त्यांनी आम्ही लवकरच आणखी एक लॉटरी आणणार आहोत, असे जाहीर केले आहे. 


जवळपास 55 पटीने अर्ज आले


मुंबईमध्ये स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. महाराष्ट्रात 1977 साली म्हाडाची स्थापना झाली. तेव्हापासून म्हाडाने सर्वांसाठी घरं बांधली. म्हाडाने आतापर्यंत साडे सात लाख घरं वाटलं आहेत. यातील अडीच लाख घरं आपण मुंबईतच दिलेली आहेत. प्रत्येकाला आपलं घर मिळावं हाच यामागचा उद्देश आहे. आजच्या लॉटरीसाठी एक लाख तेरा हजार अर्ज आले आहे आहेत. म्हणजेच जवळजवळ 55 पट अर्ज आले आहेत. यावरून मुंबईत घरांना किती मागणी आहे, हे समजते. लवकरच आम्ही अजूनही लॉटरी काढणार आहोत. त्यामुळे भविष्यातही अनेकांना संधी मिळेल, अशी माहिती सावे यांनी दिली. 


अतुल सावे नेमकं काय म्हणाले?


ज्यांना आज लॉटरी लागली आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांना लॉटरी लागलेली नाही, त्यांनी काळजी करू नये. त्यांच्यासाठी आम्ही आणखी घरांची लॉटरी जाहीर करू, असे अतुल सावे यांनी जाहीर केले. 
गेल्या दीड वर्षांत माझ्याकडे या खात्याचा चार्ज आला. आम्ही जवळपास सहा ते सात लॉटरी काढल्या. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, संभाजीनगर, नागपूर या भागात या लॉटरी काढण्यात आल्या. या लॉटरींमध्ये पारदर्शकता होती, असेही सावे यांनी सांगितले.  


स्वीकृतीपत्र द्यावे लागेल


दरम्यान, म्हडाच्या या सोडतीत यशस्वी झालेल्या तसेच प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांचे अर्जाचे क्रमांक, नाव इत्यादी म्हाडाच्या housing.mhada.gov.in a mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच Mobile App- Mhada Housing Lottery System वर प्रसिद्ध करण्यात येईल. संगणकीय सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने स्वीकृतीपत्र द्यावे लागेल. त्यानंतर म्हाडातर्फे यशस्वी उमेदवाराला तात्पुरते देकारपत्र Online Login मध्ये प्राप्त होईल. त्यानंतर विजेत्या उमेदवाराला सदनिकेची किंमत दोन टप्प्यांत भरावी लागेल. 


हेही वाचा :


म्हाडात घर मिळालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार, 10 दिवसांत 'हे' काम न केल्यास सदनिका रद्द होणार! 


Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या 2030 घरांची सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते, विजेत्यांची यादी कधी जाहीर होणार?


Mumbai Mhada Lottery : म्हाडात घर मिळाल्यावर पैसे नेमके कसे भरायचे? 25 आणि 75 टक्क्यांचा नियम जाणून घ्या!