Mumbai Gold Rate : आज (10 मे) अक्षय तृतीयेचा सण आहे. या दिवशी सोनं  (Gold) खरेदीला विशेष महत्व आहे. मोठ्या प्रमाणात लोक यादिवशी सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करत असतात. या अक्षय तृतीयेच्या सणादिवशीच सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत (Mumbai) सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. गेल्या काही दिवसापूर्वी सोनं 76 ते 77 हजार रुपयांवर गेले होते. पण सध्या मुंबईत सध्या प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी आता 73000 रुपये द्यावे लागत आहे. सोन्याच्या दरात तब्बल 4000 रुपयांची घसरण झालीय. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
   
अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोने खरेदीला अधिक महत्त्व असतं. अशात, यंदा अक्षय्य तृतीयाला सोने भाव खाऊन जाणार आहे. सोन्याच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळं यंदा सोने खरेदीत 20 टक्के वाढीचा अंदाज आहे. आज सोन्याच्या भाव 73 हजारांवर आहे. त्यामुळं सोनं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. दरात घट झाल्याचा परिणाम सोने खरेदीवर होणार आहे. खरेदी वाढण्याची शक्यता आहे. 


गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ होत होती


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होते. काही केल्या सोने चांदीचे दर कमी होत नव्हते. मात्र, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना एक प्रकारचा दिलासा मिळाल आहे. दर कमी झाले असले तरी सध्या सोनं हे 70000 रुपयांच्या पुढेच आहे. त्यामुळं सर्वसामान्य माणसाला सोनं खरेदी करणं परवडत नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, तसे न होता दरात घसरण झाली आहे. 


सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अशा काळात लोक मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी करत असतात. मात्र, दिवसेंदिवस सोने चांदी महाग होत असल्यानं लोकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. गेल्या काही दिवसापूर्वी सोनं 75 ते 76 हजार रुपयांवर देखील गेलं होतं. मात्र, आता सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झालीय. त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांना आज अक्षय तृतीयेच्या दिवशी काही प्रमाणात दिलासा मिळालाय.


महत्वाच्या बातम्या:


फक्त 11 रुपयांमध्ये करा सोन्याची खरेदी, अक्षय तृतीयेला नेमकी ऑफर काय?