Akshaya Tritiya Gold Silver News : आज अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) महत्वाचा सण आहे. या दिवशी सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळं आज सराफा बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याची शक्यता आहे. मात्र, सोन्याचा दर हा 70000 रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळं ग्राहकांच्या मनात थोडी निराशा आहे. पण आता तुम्हाला तुमच्या बजेटनुसार सोने खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. तुम्ही आता फक्त 11 रुपयांमध्येही सोने खरेदी करु शकता. तुम्ही पेटीएम, फोनपे, गुगल पे इत्यादी डिजिटल वॉलेटवरही सोने खरेदी करू शकता. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 


आज अक्षय तृतीयेच्या सणामुळं मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी केली जाते. ही खरेदी तुम्हाला घसरबसल्या देखील करता येऊ शकते. तुमच्याकडे कमी वेळ आणि कमी बजेट असेल तरीही तुम्ही सोन्याची खरेदी करु शकता. पेटीएम, फोनपे, गुगल पे याचा वापर करुन तुम्ही फक्त 11 रुपयांमध्ये सोन्याची खरेदी करु शकता. डिजिटल सोने गुंतवणुकीचा सर्वात चांगला मार्ग आहे. यामध्ये तुम्हाला 24 कॅरेट सोन्याची खरेदी करता येते. तुम्ही गूगल पे, फोनपे, पेटीएम, HDFC सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल आणि इतरांकडून सोन्याची खरेदी करु शकता. 


गूगल पे वरून कशी कराल सोन्याची खरेदी? 


सुरुवातीला तुम्हाला गूगल पे ॲप ओपन करावं लागेल. त्यानंतर सर्च बारमध्ये गोल्ड लॉकर टाइप करावं लागेल. गोल्ड लॉकरवर क्लिक करा आणि खरेदीवर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला सोन्याची सध्याची किंमत करासह दाखवली जाईल. ही किंमत खरेदी सुरू केल्यानंतर पाच मिनिटांसाठी लॉक केली जाते. कारण खरेदीची किंमत दिवसभर बदलू शकते. तुम्हाला भारतीय रुपयांमध्ये सोने खरेदी करायचे असलेले सोने एंटर करा आणि चेकमार्क निवडा, त्यानंतर तुमचा पेमेंट गेटवे निवडा आणि पेमेंट करा, यानंतर तुमची खरेदी पूर्ण होईल. एका दिवसात तुम्ही 50000 रुपयांच्या सोन्याची खरेदी करु शकता. 


डिजिटल सोने म्हणजे काय?


आता सर्वांनाच प्रश्न पडला असेल की, डिजिटल सोने म्हणजे काय? तर डिजिटल सोने हा गुंतवणुकीचा सर्वात नवीन मार्ग आहे. यामध्ये तुम्हाला 24 कॅरेट 999.9 शुद्ध सोने खरेदी करता येते. या सोन्याची खरेदी केल्यानंतर ते सोने सुरक्षीत ठिकाणी तिजोरीत जमा केले जाते. 


महत्वाच्या बातम्या:


सोने खरेदीची सुवर्णसंधी! अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज सोन्या चांदीचा दर काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर