मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहिन 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेसाठी कोट्यवधी महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत. अजूनही राज्यभरातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत आहेत. दरम्यान, ज्या महिलांनी अद्याप अर्ज दाखल केलेला नाही, त्यांना आजच्या दिवसाची ही शेवटची संधी आहे. कारण 15 ऑक्टोबरपासून लाडकी बहीण योजनेचे अर्ज बंद होणार आहेत. 


आतापर्यंत एकूण चार वेळा मुदतवाढ 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मुदत 15 ऑक्टोबरनंतर संपणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांकडे फक्त आजचा दिवस असणार आहे. महिला आपल्या भागातील अंगणवाडी सेविकांकडे हा अर्ज करू शकतात. सरकारने या योजनेत अर्ज करण्यासाठी एकूण चार वेळा मुदतवाढ दिलेली आहे. आतापर्यंत या योजनेसाठी एकूण 2 कोटी 47 लाख महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत.


आर्धार-बँक खाते लिंक करणे गरजेचे 


लाडकी बहीण योजनेची मुदत 15 ऑक्टोबरनंतर संपणार आहे. या योजनेच्या कोट्यवधी महिला लाभार्थी ठरलेल्या आहेत. काही महिलांना या योजनेचे पैसे बँक खात्यावर मिळत आहेत. पण पात्र ठरूनही अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. बँक खाते आणि आधार क्रमांक एकमेकांशी लिंक असल्यास या योजनेचे पैसे थेट खात्यावर जमा होतात. त्यामुळे ज्या पात्र महिलांना या योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत, त्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करणे गरजेचे आहे. 


अगोदर 30 सप्टेंबरपर्यंत होती मुदत 


लाडकी बहीण योजनेची मुदत एकूण चार वेळा वाढवण्यात आलेली आहे. याआधी शेवटची मुदत ही 30 सप्टेंबर होती. मात्र अनके महिलांचे अर्ज दाखल करणे बाकी असल्यामुळे तसेच जास्तीत जास्त महिलांना या योनजेचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने अर्ज करण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस असेल.


हेही वाचा :


Ladki bahin yojana लाडकी बहीण योजनेसाठी 6 पुरुषांचा अर्ज; आधार कार्ड निलंबनाची कारवाई, मागवला खुलासा


Sunil Kedar: मी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोललो असेन तर ते सिद्ध करावे अन्यथा..., सुनील केदार यांचं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान


Devendra Fadnavis: राज ठाकरेंच्या लाडकी बहीण योजनेवरील टीकेवर देवेंद्र फडणवीसांंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'दोन महिने काय पाच वर्ष...'