Devendra Fadnavis on Raj Thackeray: लाडकी बहीण योजनेवरून मिळणाऱ्या पैशांवरून आज मेळाव्यामध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला होता. पुढचा एक महिना सरकारकडून या योजनेचे पैसे मिळतील, त्यानंतर पैसे मिळणार नाहीत, लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे पुढच्या दोन महिन्यात बंद होतील, असं त्यांनी म्हटलं त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिलं आहे.
काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?
लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही पाच वर्षांपर्यंत चालणार आहे आणि या योजनेसाठी लागणारा निधी सरकारने तयार करून ठेवला आहे. त्यामुळे विरोधक काही बोलत असले, तरी मात्र ही योजना निरंतर सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अनेक लोक वल्गना करत आहे, चुकीचं सांगत आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) लागणारे सर्व पैसे बजेटमध्ये ठेवलेले आहेत. ही लाडकी बहीण योजना आताही चालणार आहे, पुढेही चालणार आहे, आणि पुढचे पाचही वर्ष टिकणार आहे, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
आज मी तुम्हाला लिहून देतो, लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आहे ना त्याचे, गेल्या काही महिन्यांचे पैसे येतील कारण निवडणुका तोंडावर आहेत. या देखील महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील नंतर येणार नाहीत. यावरती जाऊ नका तुम्ही. हे जे पैसे वाटणं सुरू आहे. त्यावरून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होईल, या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतंय त्यांच्याकडे फुकटं, महिलांच्या हाताला काम द्या, त्या कमवतील पैसे, त्या बळकट आहेत, त्यांच्या हाताला काम द्या, कोणी मागितले आहेत फुकटं पैसे, गरीबाला पैसे, मजुराला पैसे, शेतकऱ्यांना वीज फुकट द्या, शेतकरी कुठे मागतोय फुकटं वीज ते फक्त विजेत सातत्य मागत आहे, राज्यात कोणीच फुकट काही मागत नाही, यांना त्या सवयी लावायच्या आहेत.
एकदा का फुकट घेण्याची सवय लागली की, मग सगळे राजकीय पक्ष त्या पध्दतीने वागायला लागतात. त्यानंतर सर्वजण त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवत जातात. नागडा होणार आहे महाराष्ट्र. आपण याचा म्हणून काही विचार करणार आहोत की नाही, या सर्वातून हाताला काही लागणार नाही, असंही राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यांनी यावेळी म्हटलं आहे.