Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. ही एक जुलैपासून सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर काय करावं लागेल याची सविस्तर माहिती पाहुयात. 


योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लभ घेण्यासाठी सुरुवातीला आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तरीही चालणार आहे. त्याऐवजी  महिलेकडे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारी पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरले जाणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मा दाखला किंवा शाळा सोडल्याचा आवश्यक आहे. 


...तर उत्पन्नाचा दाखला लागणार नाही


दरम्यान, सुरुवातीला कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असेल तरच या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची सांगितले होते. मात्र, आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, जर तुमच्याकडे हा दाखल नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ज उपलब्ध आहे, त्यांना उत्पन्नाच्या दाखला या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे. 


योजनेची मुदत आणि वयात केली वाढ, नियमात केले 'हे' बदल


सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै, 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात आली आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. तसेच या योजने अंतर्गत आता 21 ते 65 वर्षातील महिलांना प्रत्येक महीन्याला 1500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. सुरुवातीला यामध्ये 21 ते 60 वर्षापर्यंतची अट घालण्यात आली होती. आता यामध्ये 5 वर्षांनी मुदत वाढवण्यात आली आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु, ही जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे. जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा कराल अर्ज?


अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतु सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जातील.
पात्र महिलांना योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज मंजूर झाल्यावर आधार लिंक केलेल्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरीत केली जाईल


महत्वाच्या बातम्या:


उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल