Bloomberg's Billionaires Index नवी दिल्ली: मेटा प्लॅटफॉर्म्स (Meta Platforms) चा सहसंस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zukerberg) ची नेटवर्थ 200 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली आहे. त्यामुळं झुकरबर्गनं जगातील श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत वरचं स्थान मिळवलं आहे. मार्क झुकरबर्ग या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर, दुसऱ्या स्थानी अमेझॉनचे जेफ बेजोस (Jeff Bezos) हे आहेत. पहिल्या स्थानी टेस्लाचा संस्थापक एलन मस्क आहे.
ब्लूमबर्ग बिलियनायर इंडेक्स (Bloomberg's Billionaires Index) ने 25 सप्टेंबरला अब्जाधीशांची माहिती जारी केली आहे. त्यानुसार एलन मस्क 268 अब्ज डॉलर्ससह पहिल्या स्थानावर आहे. तर, जेफ बेजोसची नेटवर्थ 216 बिलियन डॉलर्स आहे. तर, तिसऱ्या स्थानी मार्क झुकरबर्ग असून त्याची नेटवर्थ 200 अब्ज डॉलर्स आहे. झुकरबर्ग पहिल्यांदा 200 बिलियन डॉलर्स संपत्ती असलेल्या अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. मार्क झुकरबर्गच्या संपत्तीमध्ये 71 बिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे. तर, जेफ बेजोसची संपत्ती 39.3 बिलियन डॉलर्सल तर एलन मस्कची संपत्ती 38.9 बिलियन डॉलर्सनं वाढली आहे. झुकरबर्ग मेटा प्लॅटफॉर्म्सद्वारे फेसबुक, व्हाटसअप, इन्स्टाग्राम आणि थ्रेडस हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवते. सोशल मीडिया क्षेत्रात मेटाचं मोठं वर्चस्व निर्माण झालं आहे. त्यामुळं झुकरबर्गच्या संपत्तीत वेगानं वाढ झाल्याचा पाहायला मिळतं.
Louis Vuitton चे चेअरमन बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) 200 बिलियन डॉलर्सच्या क्लबपासून थोडे दूर राहिले. त्यांची सध्याची नेटवर्थ 183 बिलियन डॉलर्स आहे. डेटाबेस कंपनी Oracle चे लॅरी एल्लीसन (Larry Ellison) यांची नेटवर्थ 189 बिलियन डॉलर्स आहे. बर्नार्ड अरनॉल्टच्या संपत्तीत 24.2 बिलियन डॉलर्सची घट झाली आहे. तर लैरी एल्लीसनच्या नेटवर्थमध्ये 55.6 बिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे.
ब्लूमबर्ग बिलियनायर इंडेक्सनुसार भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी आहेत. रिलायंस इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे चेयरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या जवळ 113 बिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. अदानी समुहाचे (Adani Group) चे चेअरमन गौतम अडानी (Gautam Adani) यांच्याजवळ 105 बिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. मुकेश अंबानींची संपत्ती 16.7 बिलियन डॉलर्सची तर गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये 20.9 बिलियन डॉलर्स इतकी आहे.
इतर बातम्या :
शिक्षण फक्त 12 वी, पगार 1 लाखापेक्षा जास्त, नोकरीची मोठी संधी, कसा कराल अर्ज? काय आहे प्रक्रिया?