Mahendra Singh Dhoni : महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) भारतीय संघासाठी क्रिकेट खेळणे सोडले असले तरी त्याच्या चाहत्यांमध्ये तो अजूनही तितकाच प्रसिद्ध आहे जितका तो त्याच्या निवृत्तीपूर्वी होता. पण क्रिकेट सोडल्यानंतर महेंद्रसिंह धोनी नेमका काय करतोय? हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तर धोनी हा सध्या रांचीमध्ये एक खास व्यवसाय करत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून तो मोठी कमाई करत आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.


धोनीने सुरु केला पोल्ट्री फार्मचा व्यवसाय 


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कडकनाथ कोंबडीपालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. त्याचा रांचीमध्ये कडकनाथ कोंबडीचा खूप मोठा पोल्ट्री फार्म आहे. भारतात पोल्ट्री फार्मचा व्यवसाय झपाट्याने विस्तारत आहे. हा असा व्यवसाय आहे जो सुरू करण्यासाठी करोडो रुपयांची गरज नाही. अवघ्या काही लाख रुपयांमध्ये पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करता येतो. विशेष म्हणजे पोल्ट्री फार्मचा व्यवसाय खेडोपाडी, शहरे आणि महानगरांमध्येही सुरू करता येतो, कारण चिकनला आता सर्वत्र मोठी मागणी आहे.


कडकनाथ कोंबडीच्या पालनातून मोठा नफा


थंडीच्या मोसमात अंड्याला मागणी असली तरी उन्हाळा येताच लोकांची चिकनला मोठी मागणी असते. पण पैसे असलेले लोक देशी चिकन मांस खाण्यास प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीत पोल्ट्री फार्मशी संबंधित लोकांनी कडकनाथ कोंबडीचे पालनपोषण सुरू केले तर ते अधिक कमाई करू शकतात. कडकनाथ कोंबडी खूप महाग आहे. एका अंड्याची किंमत 50 रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे मांस 1000 रुपये किलोने विकले जाते. दिल्ली, मुंबई, कोलकाता या महानगरांमध्ये कडकनाथ चिकनची मागणी हळूहळू वाढत आहे. अशा स्थितीत कडकनाथ कोंबडी पाळल्यास सामान्य कोंबडीपेक्षा कितीतरी अधिक कमाई होईल.


कडकनाथ कोंबडीची प्रजाती मध्य प्रदेशात


कडकनाथ ही कोंबडीची प्रजाती प्रामुख्याने मध्य प्रदेशात आढळते. पण आता देशातील इतर राज्यांमध्येही पोल्ट्री फार्मशी संबंधित लोक कडकनाथच्या मागे लागले आहेत. कडकनाथ चिकन खायला खूप चविष्ट आहे. त्याचे पंख, चोच, पाय, रक्त आणि मांस सर्व काळे आहेत. विशेष म्हणजे याच्या अंड्यांचा रंगही काळा असतो. त्यात सामान्य देशी चिकनपेक्षा कितीतरी पट जास्त प्रथिने आणि जीवनसत्त्वे आढळतात. त्यामुळे त्याची मागणी हळूहळू वाढत आहे.


कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाची सुरुवात कशी करावी? 


कडकनाथ कोंबडी पाळण्याचा व्यवसायासाठी पोल्ट्री फार्म उघडायचा असेल तर तुम्हाला किमान 150 चौरस फूट जागा लागेल. शेड बांधून तुम्ही या जागेत सुमारे 100 कडकनाथ पिल्ले पाळू शकता. ही पिल्ले 5 महिन्यांत पूर्णपणे विक्रीसाठी तयार होतील. सध्या बाजारात कडकनाथ कोंबडीचे मांस 800 ते 1000 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. एका अंड्याची किंमत 50 रुपयांपेक्षा जास्त आहे. कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय सुरू करून तुम्ही 5 महिन्यांनंतर हजारो रुपये कमवू शकता. कडकनाथमध्ये देशी चिकनपेक्षा 25 टक्के जास्त प्रथिने असतात.


महत्वाच्या बातम्या:


 555 चा फॉर्म्युला वापरा, करोडपती व्हा; सविस्तर माहिती एका क्लिकवर