Ladki Bahin Yojana 2024 : मुंबई : अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सभागृहात मांडला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना (Ladki Behna Yojana), मुलींचं मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा करण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची घोषणा केली. 1 जुलैपासून या योजनेची अंमलबजावी केली जाणार आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. जुलै 2024 पासून अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्काळ लागू झाली आहे. पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Ladli Behna Yojana in Maharashtra)
लाभार्थी : 21 ते 60 वय असलेल्या महिला
अट : वर्षाला आवक 2,50,500 पेक्षा कमी
या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जाण्याची शक्यता आहे. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे.
योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार? (Ladki Bahin Yojana)
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
- किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
- सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बैंक खाते असणं आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं.
कोणत्या महिला अपात्र असतील? (Ladki Bahin Yojana in Maharashtra)
- ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु वाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
- सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
- लाभार्थ्यांचं आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला
- राक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्क (5) बँक खातं पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशनकार्ड
- सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र
- लाभार्थी निवड 'मुख्यमत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु
- सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी यांनी আतरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज
- सक्षम अधिकारी याच्याकडे सादर कराया, राम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता
- अंगणवाडी सेविका/पर्यवेशिका मुख्यसेविका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या
- जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निक्षित करण्यात येत आहे.
अर्ज कसा करायचा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
- अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतु सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया तुम्ही फॉलो करू शकता.
- पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
- त्यानंतर मिळणारी रक्कम दरमाहा पात्र महिलांना आधार लिंक केलेल्या बँक खात्यांत हस्तांतरीत केलं जाईल.