Success story Agriculture News : अलिकडच्या काळात अनेक शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. पारंपारिक पिकांना बगल देत आधुनिक पद्धतीनं पिकांची लागवड करत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची (Farmers) यशोगाथा (Success story) पाहणार आहे. श्याम सिंह (Shyam Singh) असं मध्य प्रदेशातील शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने आपल्या मिश्र शेतीतून मोठं उत्पन्न घेतलं आहे. वर्षाला ते 15 लाख रुपये कमवत आहेत.
श्याम सिंह यांना नऊ एकर जमिन आहे. यातून ते वर्षाला 15 लाख रुपये कमावत आहेत. श्याम सिंग हे भोपाळजवळील गोलखेडी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी मिश्र शेतीतून हे यश मिळवले आहे. श्याम सिंग यांनी मिश्र शेतीत जे यश मिळवले आहे त्यामुळे जवळच्या शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. मिश्र शेती म्हणजे शेतीची ती पद्धत ज्यामध्ये पिके घेण्याव्यतिरिक्त पशुपालनाचाही समावेश होतो. संपूर्ण आशिया व्यतिरिक्त, भारत, मलेशिया, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, चीन, मध्य युरोप, नॉर्डिक देश, कॅनडा आणि रशिया या देशांमध्ये या प्रकारची शेती खूप लोकप्रिय आहे.
श्याम सिंह यांनी कसं केलं नियोजन?
श्याम सिंह हे दरवर्षी मिश्र शेतीतून लाखो रुपये कमवतात. आज श्याम सिंह यांची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आत्मा' प्रकल्पात सेंद्रिय आणि कृषी विविधीकरणाच्या मदतीने आपल्या नऊ एकर जमिनीवर शेती केल्याचे श्याम सिंह यांनी सांगितले. श्यामसिंह यांनी दोन एकर जमिनीवर भाजीपाला, चार एकरांवर धान्य आणि दोन एकर जमिनीवर फळझाडे लावली. उर्वरित जमिनीवर सेंद्रिय खत तयार केले जाते.
पॉली हाऊसमध्ये भाजीपाला
श्याम सिंग यांनी कृषी विभागाच्या मदतीने पॉली हाऊस तयार केले. या पॉली हाऊसमध्ये त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली, त्यातून त्यांना भरपूर नफा मिळाला. त्यांनी पालकाची लागवड केली होती. ज्यातून त्यांना भरपूर नफा मिळाला. श्यामसिंग यांच्या दोन एकर जमिनीवर 100 ते 125 क्विंटल पालेभाज्या मिळत आहेत. त्यांचे गाव राजधानीपासून जवळ असल्याने सेंद्रिय भाज्यांना खूप मागणी आहे. स्थानिक स्वयंसेवी संस्थांमुळे सेंद्रिय भाजीपाला थेट ग्राहकांना पुरवला जातो, त्यामुळे त्यांना चांगला भाव मिळतो.
पशुपालनाचाही फायदा
श्याम सिंह शेतीसोबतच पशुपालनही करतात. यामुळे ते गावात दररोज 60 ते 70 लिटर दुधाची विक्री करतात. यातून तो दरमहा सुमारे 1 लाख 26 हजार रुपये कमावतो. श्याम सिंह यांनी शास्त्रज्ञांच्या मदतीने सेंद्रिय खत बनवण्याचे प्रशिक्षणही घेतले आहे. वर्मी कंपोस्ट खत त्यांनी तयार केले आहे.
महत्वाच्या बातम्या: