मुंबई : राज्यात कोणत्याह क्षणीव विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्षात घेता सरकारने वेगवेगळ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. जनतेच लक्ष आकर्षित करण्यासाठी सरकारकडून अनेक लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत. दरम्यान, राज्यातील अनेक शेतकरी आणि महिलांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जातोय. म्हणूनच राज्यातील काही भागव्यंत कुंटुंबाना दिवाळीपूर्वी एकूण 7000 रुपये मिळू शकतात. हे पैसे नेमके कोणत्या योजनेअंतर्गत दिले जात आहेत? त्याचा लाभ नेमका कोणाला मिळणार? हे जाणून घेऊ या...
लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण 3000 रुपये पाठवले जात आहेत. राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयाअंतर्गत पात्र महिलांना 3000 रुपये दिले जात आहेत.
पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये
केंद्र सरकारच्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 18 हप्त्याच्या वितरणास सुरुवात झाली आहे. या वितरणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी वाशिमच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी एका कार्यक्रमात मोदींनी या वितरणाचा शुभारंभ केला. या योजनेअंतर्गत 18 व्या हप्त्याच्या रुपात पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 रुपये
पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेला सुरुवात केलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये दिले जातात. तीन टप्प्यांत ही रक्कम वितरित करण्यात येते. या योजनेच्या पाचव्या हत्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. या पाचव्या हप्त्यात शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत.
भागव्यंत कुटंबांना मिळणार 7000 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेचे 3000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 रुपये, पीएम शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये असे एकूण सात हजार रुपये काही कुटुंबांना मिळू शकतात. अर्थात त्यासाठी या तिन्ही योजनांचे लाभार्थी एका कुटुंबात असणे गरजेचे आहे. एखाद्या शेतकरी कुटुंबातील एका महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तसेच पीएम शेतकरी सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळत असतील तर अशा कुटुंबांना दिवाळीच्या अगोदरच एकूण 7000 रुपये मिळतील.
हेही वाचा :
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना पुन्हा 3000 रुपये मिळण्यास सुरुवात, बँक खाते लगेच करा चेक