Lok Sabha Election Result Share Market Update : शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले
Lok Sabha Election 2024 Result Share Market Live Update : अवघ्या काही तासांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीचे अपेक्षित निकाल न आल्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. आज सत्र चालू होताच शेअर बाजार गडगडायला सुरुवात झाली होती. आता दुपारपर्यंत याच शेअर बाजाराने जास्तच बुडी घेतली. दरम्यान, शेअर बाजाराचे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक अभूतपूर्व गडगडले आहेत. दरम्यान, एका दिवसात बाजाराच्या अशा पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे आतापर्यंत कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.
lok Sabha Election 2024 Share Market Update : एक्झिट पोलच्या अंदाजानुसार निकाल न आल्यामुळे सध्या शेअर बाजारात सध्या खळबळ उडाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स थेट 4,500.95 अंकांनी गडगडला आहे. म्हणजेच काल 76568.78 अंकांवर पोहोचलेला शेअर बाजार आता थेट 71956.11 अंकांपर्यंक खाली गडगडला आहे.
Lok Sabha Election Result And Share Market Update : निवडणुकीच्या निकालामुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे, सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजाराचे आजचे सत्र चालू होताच मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) मोठी घसरण झाली आहे. बीएसईचा निर्देशांक 76285.78 अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजार 23179.50 अंकावर चालू झाला.
काल दिवसभर निफ्टी निर्देशांकही तेजीत राहिला. दिवसाच्या शेवटी निफ्टी 23263.90 अंकांवर स्थिरावला. दिवसाअखेर निफ्टीमध्ये 3.25 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे आज बाजार चालू झाल्यानंतर नेमक्या काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
LokSabha Election 2024 Result Share Market Live Update : काल दिवसभरात शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. याच तेजीचा फायदा घेत दिवसभरात सेन्सेक्स 76738.89 अंकांपर्यंत पोहोचला होता. 3 जून 2024 रोजी संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत सेन्सेक्स 3.39 टक्क्यांच्या उसळीसह 76468.78 अंकांवर होता.
Lok Sabha Election Result Share Market Live Update आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर प्रत्येक जागेवरचा निकाल हळूहळू स्पष्ट होईल. भाजपने यावेळी 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष ठेवलेले आहे. तर यावेळी आम्हीच जिंकू असा विश्वास विरोधकांच्या इंडिया आघाडीने व्यक्त केलेला आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, यावरूनच शेअर बाजारात घडामोडी घडणार आहेत. त्यामळे आज निकालाच्या दिवशी गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची चांगली संधी मिळणार आहे.
आता अवघ्या काही तासांत आज शेअर बाजार बंद होईल. मात्र आज दिवसभर निफ्टी आणि सेन्सेक्सचे निर्देशांक चढेच राहिले. सध्या मुंबई शेअर बाजार 2,342.62 अंकांच्या तेजीसह 76,303.94 अंकांवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत ही वाढ टक्के आहे. राष्ट्रीय शेअर बाजारदेखील 697.55 अंकांनी वधारून 23,228.25 अंकांवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत ही
मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. मतदान संपल्यानंतर वेगवेगळी माध्यमं तसेच इतर संस्था आपापल्या एक्झिट पोलचे (Lok Sabha Election 2024 Exit Polls) आकडे जाहीर करतील. याच आकड्यांच्या मदतीने देशात कोणाची सत्ता येणार? याचे अंदाज बांधले जातील. प्रत्यक्ष निकाल येत्या 4 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. याच निकालाचा परिणाम सध्या शेअर बाजारावर दिसतो. देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचाच साकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसतोय. आज आठवड्याचा पहिल्याच दिवस आहे. या दिवशी शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आज सकाळच्या प्री-ओपनिंग मार्केटमध्येच दिसून आला. प्री-ओपनिंग मार्केट सेशनमध्ये मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) यांच्यात मोठी उसळी पाहायला मिळाले. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा
मुंबई : एक्झिट पोलमध्ये (Exit Polls) देशात पुन्हा एका मोदी हेच सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच शक्यतेचा भारतीय शेअर बाजारावर (Share Market) परिणाम झाला. या आठवड्यात आज पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या निफ्टी (NIFTY) आणि सेन्सेक्स (Sensex) या प्रमुख निर्देशांकांत मोठी तेजी पाहायला मिळाली. हे दोन्ही निर्देशांक उसळल्यामुळे गुंतवणूकदारांनी अवघ्या काही मिनिटांत लाखो कोटी रुपये कमवले आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा
पार्श्वभूमी
Lok Sabha Election Vote Counting Share Market Update : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मतमोजणी केली जात आहे. 1 जून रोजी समोर आलेल्या एक्झिट पोलच्या (Lok Sabha Exit Poll) अंदाजानुसार यावेळी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीच सत्ता येण्याची वर्तवली जात होती. त्याचाच परिणाम सोमावारी शेअर बाजारावर झाला. सोमावरी सत्र चालू होताच सेन्सेक्स (SENSEX) आणि निफ्टीने (NIFTY) मोठी उसळी घेतली होती. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांनी 11 लाख कोटी रुपये कमवले. मंगळवारीही (4 जून) शेअर बाजारात मोठे-चढउतार होत आहेत. अनपेक्षित निकाल लागत असल्यामळे शेअर बाजार चांगलाच कोसळला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -