Loan on Car Process: तुम्ही कार लोन बद्दल ऐकले असेल, पण तुमच्या कारवरही तुम्हाला लोन मिळू शकतो, हे तुम्हाला माहित आहे का? होय, गरज पडल्यास जसे घरावर कर्ज घेता येत, त्याच पद्धतीने तुम्ही कारवर कर्ज घेऊ शकता. अनेक बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) 'कार अगेन्स्ट कार' वर कर्ज देतात.
काय आहे कारवर कर्जाची सुविधा
सध्या देशात अनेक बँका आणि एनबीएफसी आहेत, ज्या कारवर कर्ज देतात. तातडीच्या पैशांची गरज भासत असेल आणि तुमच्याकडे कोणतेही साधन नसेल, तर तुम्ही कारवर कर्ज घेऊ शकतात. यामध्ये कारच्या सध्याच्या किमतीच्या 50 ते 150 टक्के कर्ज (अटी लागू) मिळू शकते. कारवर कर्ज 1 ते 7 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले जाऊ शकते. यासाठी प्रक्रिया शुल्क 1 ते 3 टक्के असू शकते. साधारणपणे 10 वर्षांपेक्षा कमी जुन्या गाड्यांवरच कारवर कर्ज मिळू शकते. ज्या लोकांकडे नोकरी किंवा व्यवसाय यासारखे उत्पन्नाचे स्थिर स्त्रोत आहेत, त्यांना कारवर कर्ज उपलब्ध होऊ शकते. 21 ते 65 वर्षे वयोगटातील लोक हे कार लोन घेऊ शकतात.
ही गोष्ट ठेवा लक्षात
कार कर्जासाठी बँक किंवा NBFC ला किमान 9 महिने कर्ज परतफेड किंवा क्रेडिट कार्ड परतफेड स्थिती आवश्यक आहे. जर तुम्ही आधी कर्ज घेतले असेल आणि वेळेवर परतफेड केली असेल, तरच बँका तुम्हाला कारवर कर्ज देण्यास पात्र समजू शकतात.
कारवरील कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
फोटो आयडी कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, तीन वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न, तीन महिन्यांची सॅलरी स्लिप, सॅलरी अकाउंट स्लिप, कारची आरसी आणि गाडीची विम्याची कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे लागतील. कर्ज घेताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तुम्ही सर्व कागदपत्रे अगोदरच गोळा करावीत.
इतर महत्वाच्या बातम्या:
सरकारी कंपनी 'बीपीसीएल'ची विक्री होणार का? सहा महिन्यात स्पष्ट होईल चित्र
Inflation : महागाईच्या काळात गुंतवणुकीचे व्यवस्थापन कसे कराल? वाचा गुंतवणुकीचे पर्याय
Small Saving Schemes: खूशखबर! छोटी बचत, मोठा फायदा, कोणत्या योजना तुमच्यासाठी फायद्याच्या?