Good News Soon On Small Saving Schemes : एनएससी (NSC), पीपीएफ(PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनासारख्या( Sukanya Samridhi Yojna) बचत योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात पुन्हा एकदा 0.50 टक्के रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे बचत योजनांवरील व्याजदर वाढण्याचा मार्ग मोकळा झालाय. महिनाभरात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 90 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. त्यानंतर आता असे म्हटले जातेय की, केंद्र सराकर बचत योजनांवरील व्याजदर 0.50 पासून 0.75 टक्केंपर्यंत वाढ होऊ शकते. आर्थिक मंत्रालयाकडून प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीला बचत योजनांच्या व्याजदराची समीक्षा करुन त्याची घोषणा केली जाते.
बचत योजनांवरील व्याज दर वाढू शकते -
आरबीआयच्या रेपो रेट वाढवण्याच्या निर्णानंतर काही बँकांनी डिपॉजिट्सवरील व्याज दर वाढवण्यास सुरुवात केली आहे. अशात असा अंदाज बांधला जातोय की, एक जुलैपासून बचत योजनांवरील व्याजदरात वाढ होईल. आरबीआयने आधी 4 मे रोजी आणि आता 8 जून रोजी रेपो रेटमध्ये जवळपास 90 बेसिस पॉईंटने वाढ केली. म्हणजेच रेपो रेट 4.90 टक्कें करण्यात आलाय. सध्याच्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी अर्थ मंत्रालय या बचत योजनांवरील व्याजदराची समीक्षा करेल तेव्हा सेविंग स्कीमवरील व्याजदरांवर नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे.
बचत योजनांवीरल व्याज दर
सध्या पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉविडेंट फंड यावरील वार्षिक व्याजदर 7.1 टक्के आहे. एनएससी म्हणजेच नॅशनल सेविंग सर्टिफिकेटवर 6.8 टक्के वार्षिक व्याजदर मिळतेय. तर सुकन्या समृद्धी योजनावर (Sukanya Samridhi Yojna) 7.6 टक्के आणि सीनिअर सिटीजन सेविंग स्कीमवर ( Senior Citizen Saving Scvheme) 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळतेय. किसान विकास पत्र ( Kisan Vikas Patra) वर 6.9 टक्के वार्षिक व्याज मिळतेय. एक वर्षाच्या मुदत ठेवीवर 5.5 टक्के व्याज मिळतेय. तर एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.5 ते 6.7 पर्यंत व्याज मिळते.
एप्रिल 2020 पासून व्याजदरात बदल नाही -
2020-21 च्या पहिल्या तिमाहीपासून छोट्या बचत योजानांवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे आता छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे रेपो रेट वाढल्यामुळे गृहकर्ज वाढणार आहे. त्यात आता छोट्या योजनांत गुंतवणूक करणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.