J​EE​ Mains Exam: या वर्षी जेईई मेन 2022 परीक्षा 20 ते 29 जून दरम्यान सुरू होणार आहे. यंदा परीक्षेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. एनटीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी केंद्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक आहे. याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे सीसीटीव्हीचे ऑनलाइन मॉनिटरिंग केले जाणार आहे. कोणत्याही केंद्रावर गडबड झाल्यास एनटीएच्या दिल्ली कार्यालयाला माहिती मिळेल.


परीक्षा केंद्रांची पडताळणी एनटीएकडून करण्यात आली आहे. याशिवाय कोणत्याही केंद्रावर सीसीटीव्ही बंद असल्यास कारवाई केली जाईल. या परीक्षेची वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. याशिवाय दुसऱ्या बॅचची परीक्षा दुपारी 3 वाजता सुरू होणार असून ती सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे.


गॅझेट घेऊन जाण्याची परवानगी नाही


मीडिया रिपोर्ट्सनुसार, परीक्षेपूर्वी एक चाचणी होईल. केंद्राला सर्व वर्ग आणि आसन योजनांची माहिती देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसोबतच ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेऊन जाण्याची परवानगी नसणार. याशिवाय विद्यार्थ्यांना टोपी घालण्याची परवानगी देखील नाही. त्याचबरोबर विद्यार्थिनींना दागिने घालून परीक्षेला बसू दिले जाणार नाही.


या तारखा लक्षात ठेवा


जेईई मेन 2022 च्या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक माहित असणे आवश्यक आहे. 



  • जेईई परीक्षेच्या तारखा - 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 जून 2022 

  • प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख - 7 ते 10 जून 2022 

  • जून सत्राचा निकाल - 15 जुलै 2022 पर्यंत 

  • JEE Advanced 2022 नोंदणी - 7 ऑगस्ट 2022 

  • JEE Advanced 2022 परीक्षा - 28 ऑगस्ट 2022


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra HSC Result 2022 : 12 वी नंतर काय कराल? जाणून घ्या शिक्षणाच्या संधी


निकालानंतर वर्षा गायकवाड म्हणाल्या, परीक्षेच्या काळात काही हितशत्रूंनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण...


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI