LIC Update: सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी LIC ने आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कालावधीत कंपनीच्या नफ्यात 50 टक्क्यांनी घट झाली आहे. एलआयसीचा नफा 7 हजार 925 कोटी रुपये आहे. जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 15 हजार 952 कोटी रुपये होता.


एलआयसीच्या उत्पन्नातही घट


स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये, LIC ने सांगितले की दुसऱ्या तिमाहीत निव्वळ प्रीमियम उत्पन्न 1 लाख 7 हजार 397 कोटी रुपये होते. जे गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत 1 लाख 32 हजार 631.72 कोटी रुपये होते. एलआयसीच्या उत्पन्नातही घट झाली आहे. कंपनीचे उत्पन्न 2 लाख 1 हजार 587 कोटी रुपये आहे. जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 2,22,215 कोटी रुपये होते. LIC चा एकूण NPA 2.43 टक्के आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 5.60 टक्के होता. मात्र, निव्वळ एनपीएमध्ये कोणताही बदल झालेला नाही. एलआयसीचे गुंतवणुकीचे उत्पन्न वाढून 93,942 कोटी रुपये झाले आहे जे मागील वर्षी 84,103 कोटी रुपये होते. एलआयसीच्या प्रीमियम उत्पन्नात घट झाल्यामुळं गुंतवणूकदारांची चिंता वाढू शकते. सर्वप्रथम, ज्या गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांना त्यांच्या गुंतवणुकीचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय, हे त्रैमासिक निकाल त्यांना आणखी निराश करू शकतात.


LIC ने मे 2022 मध्ये सर्वात मोठा IPO आणला होता. कंपनीने 949 रुपये प्रति शेअर या भावाने बाजारातून पैसे उभे केले होते. परंतु शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 रोजी बाजार बंद झाल्यावर 949 रुपयांची किंमत असलेले शेअर्स 610 रुपयांवर बंद झाले. याचा अर्थ गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर 36 टक्के किंवा प्रति शेअर 339 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. एलआयसीचे बाजार भांडवल 3.86 लाख कोटी रुपयांवर आले आहे. ज्या इश्यू प्राइसवर LIC ने IPO आणला होता, तिची मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपये होती. म्हणजेच LIC च्या बाजार भांडवलात 2.14 लाख कोटी रुपयांहून अधिक घट झाली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Pension : फक्त एकदाच प्रीमियम भरा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन; जाणूम घ्या भन्नाट स्कीम