Diwali 2023 : राज्यासह देशभरात दिवाळीचा (Diwali 2023) सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातोय. धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवसापासूनच लोकांनी दिवाळीची खरेदी करायला सुरुवात केली. पण, गोडा-धोडाचे, मिठाईशिवाय सणांची खरी मजा पूर्ण होत नाही. अशा वेळी बाजारात सर्वाधिक भेसळयुक्त मिठाई विकली जाते. ही मिठाई तुमच्या आमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असते. यासाठी विशेषत: आरोग्य तज्ज्ञ दिवाळीत मिठाई विकत घेण्यासाठी सावध करतात. 


पण, दिवाळीला बाजारातून मिठाई विकत घेण्याऐवजी तुम्ही घरीही मिठाई बनवू शकता. घरी बनवलेल्या मिठाईमध्ये उच्च दर्जाच्या पदार्थांचा वापर केला जातो. कोणत्याही परिस्थितीत, सणासुदीच्या काळात साखर टाळण्याचा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही साखरेऐवजी काही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला मिठाईमध्ये वापरल्या जाणार्‍या ड्रायफ्रुट्सबद्दल सांगणार आहोत.


अंजीर


दिवाळीची मिठाई बनवताना तुम्ही प्रक्रिया केलेल्या साखरेऐवजी अंजीरचा वापर करू शकता. अंजीर वापरल्याने मिठाईची चव तर वाढतेच पण आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही ते खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमची हाडे मजबूत होतात आणि पोटाच्या समस्यांमध्येही हे खूप फायदेशीर आहे.


खजूर


अँटीऑक्सिडंट्स, लोह, जीवनसत्त्वे याबरोबरच कॅरोटीनॉईड्स, फ्लेव्होनॉईड्स आणि फिनोलिक अॅसिड अशा अनेक गोष्टी खजूरमध्ये आढळतात. तुमची मिठाई गोड करण्याबरोबरच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.


सुकलेले जर्दाळू


मिठाई घरी बनवताना तुम्ही सुक्या जर्दाळूचाही वापर करू शकता. त्यात व्हिटॅमिन ए, सी, के आणि बी कॉम्प्लेक्ससह अनेक प्रकारचे खनिजे आढळतात. यामुळे मिठाईची चव दुप्पट तर होईलच पण ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरेल.


मनुका


सण-उत्सवात गोड पदार्थ बनवताना मनुक्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रथिने आणि निरोगी फॅटसह अनेक प्रकारचे पोषक घटक त्यात आढळतात. अशा प्रकारे तुम्ही जर सणासुदीला घरी मिठाईचे किंवा गोजाचे पदार्थ बनवणार असाल तर तुम्ही साखरेऐवजी या ड्रायफ्रूट्सचा वापर तुम्ही अगदी सहज करू शकता. यामुळे तुमची मिठाई टेस्टी तर होईलच. शिवाय तुम्ही देखील हेल्दी राहाल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी